पुणे

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये मराठी विषयाचे आंतरराष्ट्रीय वेबिनारचे आयोजन हडपसर

रयत शिक्षण संस्थेचे एस. एम. जोशी कॉलेजमध्ये मराठी विभाग आयोजित आंतरराष्ट्रीय वेबिनारचे आयोजन केले आहे .मराठीतील 1960 नंतरचे विविध वाङ्मयीन प्रवाह व सद्य:स्थिती या विषयावर हे आंतरराष्ट्रीय वेबिनार होणार आहे. या आंतरराष्ट्रीय वेबिनारचे उद्घाटन हॉलंड, नेदरलॅंडचे कवी व चित्रकार मा. भास्कर हांडे करणार आहेत. या उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस विचार व्यक्त करणार आहेत. रयत शिक्षण संस्थेचे ऑडिटर प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे अध्यक्षस्थानी राहणार आहेत. तसेच मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागप्रमुख डॉ. वंदना महाजन, गोवा विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख डॉ. चिन्मय घैसास, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी मराठी विभाग प्रमुख डॉ. तुकाराम रोंगटे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्या परिषद सदस्य डॉ. सुधाकर शेलार, अलिगड मुस्लिम विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख डॉ. ताहेर पठाण, सक्षम समीक्षेचे संपादक डॉ. शैलेश त्रिभुवन, मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ.संदीप सांगळे हे विविध विषयांवर शोधनिबंध सादर करणार आहेत. समारोप समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख डॉ. प्रभाकर देसाई विचार व्यक्त करणार आहेत. अध्यक्षस्थान महात्मा फुले कॉलेजचे प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड भूषवणार आहेत. अशी माहिती एस. एम. जोशी कॉलेज चे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी दिली. वेबिनारचे संयोजन मराठी विभागप्रमुख व समन्वयक डॉ. राजेंद्र ठाकरे ,सहसमन्वयक डॉ. अतुल चौरे, डॉ. नम्रता मेस्त्री, डॉ संदीप वाकडे करणार आहेत.अशी माहिती प्राचार्य, डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी दिली.