पुणे

आपली सेंकड इनिंग सुरू झाली आहे, त्याचा भरपूर आनंद घ्या – डॉ. झांजुर्णे

पुणे (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन)

आपली सेंकड इनिंग सुरू झाली आहे, त्याचा भरपूर आनंद घ्या. रोज चालणे, जलद चालने, सायकलिंग करा शक्य असेल तर पळणे, भटकंती करून जीवनातील आनंद घ्या व स्वतः साठी जगा हा प्रेमळ सल्ला जर्मन येथील जागतिक “आयर्न मन” स्पर्धेत सहाव्यांदा यश मिळविलेले डॉ. राहुल नवनाथ झांजुर्णे यांनी दिला. यावेळी त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी डॉ. स्मिता राहुल झांजुर्णे यांनी ही आयर्न मन पुरस्कार मिळाला आहे हे एक विशेष उल्लेखनीय आहे.

या वेळी किर्लोस्कर न्यूमेटिक येथील सेवा निवृत्त जेष्ठ नागरिकांच्या वतीने आर्थोपेडिक सर्जन डॉ.राहूल झांजुर्णे यांचा सपत्नीक सत्कार आयोजित केला होता प्रसंगी डॉक्टर बोलत होते. यावेळी नवनाथ झाजुर्णे, सुधीर मेथेकर, भाऊसाहेब ढमाळ, चंद्रकांत मांढरे, श्रीशैल जकुणे
महादेव धर्मे, सुरेश भोसले, गणेश उंद्रे, राजन जोशी, विकास घुले, राजकुमार धुमाळ, मोहन महामुनी, श्रीराम शिंदे आदी उपस्थित होते.

एकदम मस्त व खेळीमेळीच्या उत्साहात हा सत्कार समारंभ संपन्न झाला. प्रसंगी डॉक्टरांनी तेथील थरारक अनुभव सांगितले. यावेळी डॉक्टरांनी पेशा सांभाळून आमच्यासाठी वेळ दिला त्याबद्दल सर्व जेष्ठांनी आभार मानले. या वेळी झांजुर्णे कुटुंबातील चारही पिढ्यांनी हजेरी लावली होती.