पुणे,
हडपसर-ग्लायडिंग सेंटरजवळ थांबलेल्या संशयिताला अटक करून त्याने चोरलेल्या नऊ दुचाक्या जप्त केल्या. हडपसर पोलिसांनी सूत्रांकडून माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.
यशदिप गोविंद कोंडार (वय 22, रा. शिवशक्ती चौक, गंगानगर, भेकराईनगर, हडपसर, मूळ रा. त्रिसंगम सोसायटी, नंदादिपनगर, मृणाली रोड, चक्की नाका, कल्याण, जि. ठाणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी सांगितले की, हडपसर पोलीस ठाणे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना संशयित एकजण चोरीची दुचाकी ग्लायडिंग सेंटरजवळ थांबला असल्याची माहित सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतल्यानंतर त्याने हडपसर-५, चंदननगर-१, बंडगार्डन-२ आणि विश्रांतवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील एक अशी नऊ वाहने चोरल्याची कबुली दिली असून, त्याच्याकडून चार लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. इतर दोन मोटार सायकलचा मालकांचा शेाध पोलीस घेत आहेत. तसेच त्यांचे इतर कोणी साथीदार आहेत काय याचा शोध सुरू असून, पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.
अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांच्या मागदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते, हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, पोलीस निरीक्षक राजू अडागळे, दिगबंर शिंदे, तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने, पोलीस हवालदार प्रदीप सोनवणे, गणेश क्षीरसागर, पोलीस नाईक अविनाश गोसावी, संदीप राठोड, समीर पांडुळे, शशिकांत नाळे, सचिन जाधव पोलीस शिपाई शाहीद शेख, रियाज शेख, प्रशांत टाणपे, प्रशांत दुधाळ, निखील पवार, सचिन गोरखे, सूरज कुंभार यांच्या पथकाने ही कारवाई केली.