पुणे : पुणे महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यास राज्य सरकारने गुरुवारी मंजुरी दिली आहे. या प्रश्नाबाबत बुधवारी राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्यासोबत अधिकारी-कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक झाली होती. त्यास तत्काळ मंजुरी दिल्याबद्दल पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मी आदरणीय अजितदादा पवार यांचे आभार व्यक्त करतो.
महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत बुधवारी मंत्रालयात आदरणीय अजितदादा पवार यांच्या दालनात बैठक झाली होती. या वेळी आदरणीय अजितदादांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारून त्यावर सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनास पुढील आठवडाभरात राज्य सरकारची मान्यता मिळेल, असा शब्दही दिला होता. परंतु, शब्द दिल्याच्या दुसऱ्याच दिवशी आदरणीय अजितदादांनी हा प्रश्न मार्गी लावला असून, महापालिकेतील अधिकारी – कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याच राज्य सरकारची मंजुरी मिळाली आहे.
आदरणीय अजितदादा पवार हे केवळ शब्द देणारे, आश्वासन देणारे नेते नसून, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारे नेते आहेत. त्यांचा शब्द म्हणजे, आपले काम होणारच याची प्रचिती पुन्हा एकदा आली. त्याबद्दल, आदरणीय अजितदादा पवार यांचे पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी शहराध्यक्ष या नात्याने आभार व्यक्त करतो.