पुणे :
वडिलांच्या मृत्यूनंतर मालमत्तेसाठी सावत्र आईला घरातून बेदखल करणाऱ्या आणि घरफोडीच्या खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या मुलगा,मुलगी आणि सुनेविरुद्ध पुण्यात ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.कल्पना किशोर सणस या महिलेने झालेल्या अन्यायाबाबत पोलीस आयुक्त कार्यालयात संपर्क साधून छळ झाल्याची तक्रार केली असता त्यांचा सावत्र मुलगा रुक्षेत, सून गौरी,सावत्र मुलगी निकिता यांच्याविरोधात ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे.गौरी ही माजी नगरसेविका सुनंदा गडाळे यांची मुलगी असून रुक्षेत हा जावई आहे .
किशोर सणस( राहणार सहकारनगर गुरुकृपा बंगला किरण सोसायटी) यांच्या पहिल्या पत्नीच्या 1990 साली झालेल्या मृत्यूनंतर त्यांनी कल्पना सणस( राहणार :बारामती काटेवाडी) यांच्यासोबत 1994 साली विवाह केला. पहिल्या पत्नीपासून किशोर सणस यांना रूक्षेत आणि निकिता दोन मुले झाली होती . 27 वर्षापासून त्या सहकारनगर येथे वरील बंगल्यामध्ये आपल्या पतीसोबत राहत होत्या. दिनांक 4/6/21 रोजी किशोर सणस यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सर्व विधी पार पडल्यानंतर मुलांनी बंगला साफ करण्याचे कारण काढून सावत्र आईला बारामती येथे नातेवाईकांकडे जाण्यासाठी सांगितले व त्यांच्याकडून बंगल्याच्या सर्व चाव्या दागिने काढून घेतले. त्यानंतर पुन्हा बारामती वरून पुण्याला घरी येण्यासाठी निघाल्यावर मुलांनी आईला बंगल्यामध्ये पाय ठेवायच नाही म्हणून धमकी दिली. यावर व्यथित होऊन त्या सहकार नगर पोलिस स्टेशन येथे गेल्या तेथे पोलिस निरीक्षक गुन्हे युनुस मुलाणी यांच्या कानावर सर्व प्रकार घातला व सर्व कागदपत्रे पत्नी असल्याचा पुरावा फोटो पुराव्यानिशी दाखवले. यानंतरही पोलिसांनी मुलांना पोलिस स्टेशनला बोलून घेतले तेथे मुलांनी स्वतःच्या आईला ओळखण्यास नकार दिला व ही आमच्याकडे कामवाली म्हणून आहे असे सांगितले. यानंतर मुलानी यांनी आपआपसामध्ये मिटवून घ्या मी मुलांना समजून सांगतो ,असे उडवाउडवीचे उत्तर दिले व तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिला. दोन दिवसांनी मला भेटा असे सांगितले यावर कल्पना सणस यांनी पोलीस स्टेशनला दिनांक 29/07/21 रोजी लेखी तक्रार अर्ज दाखल केला.
या सर्व प्रकाराची घटनेची पोलिसांना माहिती असताना सुद्धा सावत्र मुलांच्या सांगण्यावरून 04/08/21 ऑगस्ट रोजी सावत्र आई कल्पना सणस व घरातील सहा नोकर यांच्याविरुद्ध 380,454,457 IPC प्रमाणे घरफोडी व चोरीचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी जाणीवपूर्वक सर्व माहिती असताना टाळाटाळ केली. त्यांचे म्हणणे जाणिवपूर्वक दूर्लक्ष करुन सदर महीलेच्या विरूद्ध खोटा गुन्हा दाखल केला.याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी या प्रकरणाचा तपास माझ्याकडं नसल्याचे उडवाउडवीचे उत्तर दिले. पोलिसांनी जाणीवपूर्वक खोटी फिर्याद दाखल करून घेतली तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई यांनी लक्ष देण्यास टाळाटाळ केली.कल्पना सणस या अनुसूचित जाती जमातीच्या म्हणजे चर्मकार समाजाच्या असल्या कारणामूळे त्यांनी या छळबाबत सहकारनगर पोलिस स्टेशनला ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत तक्रार घेण्याची विनवणी केली असता पोलिसांनी त्यात टाळाटाळ केली.
कल्पना सणस यांनी या सर्व खोट्या आरोपविरुद्ध अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी न्यायालयांमध्ये दाद मागितली असता सत्य परिस्थिती न्यायालयासमोर आल्यानंतर न्यायालयाने कल्पना सणस यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला.
कल्पना सणस यांनी झालेल्या अन्यायाबाबत पोलीस आयुक्त कार्यालयात संपर्क साधून तक्रार केली असता त्यांच्या तक्रारी प्रमाणे मुलगा रुक्षेत,सुन गौरी,मुलगी निकिता यांच्याविरोधात ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे.
या गुन्ह्यांमध्ये न्यायालयाने आरोपींचा तात्पुरता जामीन अर्ज फेटाळला आहे.तरीसुद्धा पोलिसांमुळे इतक्या गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपींना अद्यापपर्यंत अटक झाली नसून पिडीत महिलेला न्याय मिळालेला नाही.
पिडीत महिलेस कायदेशीर मार्गदर्शन व कोर्टामध्ये अटकपूर्व जामीन घेण्यास अॅड समीर सहाणे आणि अॅड अमित काटे यांनी न्यायालयामध्ये बाजू मांडली. महिला ही मुळ काटेवाडी गावातील रहिवासी म्हणजेच उप मुख्यमंत्री अजित पवार यांचे गावातील रहिवासी असूनही तिच्यावर इतका अन्याय झाला आहे,असे अॅड समीर सहाणे,अॅड अमित काटे यांनी सांगितले.