हडपसर (प्रतिनिधी) रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम .जोशी कॉलेजमध्ये भौतिकशास्त्र , इलेक्ट्रॉनिक व आय. क्यू. ए .सी .यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय वेबिनारचे आयोजन मंगळवार दिनांक 5 ऑक्टोबर रोजी केले आहे. या वेबिनारचे उद्घाटन प्रमुख पाहुणे कोरियाचे प्रोफेसर यंग पाक ली हे करणार आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रोफेसर डॉ. अरविंद शालिग्राम हे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. तसेच अधिष्ठाता (सुरत) डॉ. निशाद देशपांडे व संभाजी शिंदे डॉ. नागेश मैले, लंडनचे डॉ. सचिन सेंदिया हे विविध विषयांवर शोधनिबंध सादर करणार आहेत. समारोप समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रोफेसर डॉ. प्रमोद पाटील विचार व्यक्त करणार आहेत. अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रोफेसर डॉ. संजय ढोले राहणार आहेत .अशी माहिती एस .एम. जोशी कॉलेज चे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी दिली .,उपप्राचार्य प्रा. संजय जडे, आय.क्यू.ए. सीचे चेअरमन डॉ. किशोर काकडे,भौतिकशास्त्र विभागप्रमुख, समन्वयक प्रा. मोहनसिंग पाडवी ,सहसमन्वयक डॉ. रत्नमाला वाघमोडे, प्रा. महेश बागल प्रा. दिनेश लोहार, प्रा. हेमंत देव करणार आहेत. अशी माहिती प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी दिली.
एस. एम. जोशी कॉलेजमध्ये भौतिकशास्त्र व इलेक्ट्रॉनिक विषयाचे आंतरराष्ट्रीय वेबिनारचे आयोजन
October 5, 20210
Related Articles
April 28, 20230
पुणे पुरवठा विभागातील उत्कृष्ट कामाचे राज्यभर अनुकरण व्हावे- अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण
पुणे, दि.२८ : रास्त भाव दुकानातून ब्रॉडबॅण्ड सेवा उपलब्ध करुन देण्याच्या कें
Read More
December 1, 20210
आता प्राणपणाने सविधानचे जतन आणि पालन करूया हीच स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर सुभाष देसाई यांचे आवाहन
ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून भारतीय मुक्त झाले त्यातून भारतीय संविधानाचा उ
Read More
July 14, 20230
“राज्य मंत्रिमंडळाचे फेरबदलासह खातेवाटप जाहीर – अजित पवार यांच्याकडे अर्थ तर धनंजय मुंडे कृषिमंत्री”
मुंबई, दि. १४: राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोब
Read More