हडपसर पुणे येथे नुकतीच यशवंत ग्राहक आधार प्रतिष्ठानची बैठक संपन्न झाली. या बैठकीत शहर, तालुका,पुणे जिल्हा कार्यकारणीची निवड करण्यात आली. यावेळी अशोक आव्हाळे यांची हवेली तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. या निविडीचे पत्र महाराष्ट्र प्रदेश यशवंत ग्राहक आधार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुर्यकांत गवळी यांच्या हस्ते देण्यात आले.
आताच्या काळात ग्राहकांची मोठी फसवणूक होताना दिसत आहे. ही फसवणूक कुठे तरी थांबली पाहिजे असे मत गवळी यांनी व्यकत केले. ग्राहकांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठीच यशवंत ग्राहक आधार प्रतिष्ठान ही संघटना स्थापन केली आहे. या संघटनेचे काम राज्यभर चालु आहे. अशोक आव्हाळे यांनी पुर्वी राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण समितीचे तालुका अध्यक्ष म्हणुन काम केले आहे. त्याचा अनुभव पाहुन आव्हाळे यांची निवड करण्यात आली.
हवेली तालुक्यातील प्रत्येक गावात शाखा सुरू करुन लोकांना ग्राहक कायद्याचे ज्ञान समजावून सांगण्याचे काम करणार असल्याचे या निविडीला उत्तर देताना अशोक आव्हाळे म्हणाले. तालुका अध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल आव्हाळे यांचे सर्वमान्यवरांनी अभिनंदन केले.
यावेळी प्रदेश अध्यक्ष सुर्यकांत गवळी, महिला अध्यक्ष अनिताताई गवळी, स्मिता गायकवाड, महेंद्र बनकर, दिलीप भोसले इ.अनेक मान्यवर उपस्थित होते.