पुणे

फुरसुंगीत घरफोडी : हडपसर पोलिसांकडून दोन विधिसंघर्षित ताब्यात कारवाईत १७ तोळे सोन्याचे दागिने, गुन्ह्यातील दुचाकी, मोबाईल  फोन जप्त

 

पुणे ः घरफोडी करणाऱ्या चोरणाऱ्या दोन विधिसंघर्षित बालकांना दहा तासांत हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून करून १० लाख २५ हजार रुपयांचे १७ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली मोपेड, अॅपल फोन जप्त केल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते यांनी दिली.

फुरसुंगीमधील रोहित रामकिशन केंडे (वय ३४, रा. मल्हार बिल्डिंग, दुसरा मजला, फुरसुंगी) यांच्या घरी ९ ते ११ ऑक्टोबर दरम्यान चोरी झाल्याची फिर्याद त्यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला होता. तपास पथकातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, देहबोली आणि सूत्रांच्या माहितीनुसार तपास सुरू केला. दरम्यान, फुरसुंगीतील घरफोडी करणारे दोन मुले फुरसुंगी पुलाजवळील अपेक्षा लॉन्स येथे मायस्ट्रो मोपेडवरून येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या दोन टीमने सापळा रचून संशयावरून दोघांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे घरफोडीत चोरीला गेलेले दागिने मिळून आले. घराचे कुलूप तोडून चोरी करून वाटून घेतल्याचे त्यांनी सांगितले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने करीत आहेत.

अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते, हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, पोलीस निरीक्षक राजू अडागळे, दिगंबर माने यांच्या सूचनेप्रमाणे तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक सौरक्ष माने, पोलीस अंमलदार अविनाश गोसावी, संदीप राठोड, समीर पांडुळे, शशिकांत नाळे, सचिन जाधव, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे, रियाज शेख, सचिन गोरखे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते म्हणाले की, अलिकडे विधिसंघर्षित बालक गुन्हेगारी क्षेत्राकडे वळत असल्याची गंभीर बाह आहे. त्यामुळे पालकांनी आपला पाल्य काय करतो, कोणाबरोबर जातो, मित्र कोण आहेत, मुलांवर चांगले संस्कार करावेत, चांगले शिक्षण देणे ही काळाची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, हडपसर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घरफोडीच्या गुन्ह्यातील विधिसंघर्षित बालकांना बाल न्याय मंडळामध्ये हजर केले. त्यावेळी त्यांच्या वतीने अॅड. विराज करचे यांनी काम पाहिले.