पुणे

पुणे विभागातील 19 लाख 53 हजार 848 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी विभागात कोरोना बाधित 20 लाख 3 हजार 686 रुग्ण -विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे, (वि.मा.का.) दि. 14 :- पुणे विभागातील 19 लाख 53 हजार 848 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 20 लाख 3 हजार 686 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 390 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 41 हजार 448 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.07 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 97.51 टक्के आहे. अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 11 लाख 45 हजार 382 रुग्णांपैकी 11 लाख 21 हजार 593 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 4 हजार 881 आहे. कोरोनाबाधित एकूण 18 हजार 908 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.65 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 97.92 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 50 हजार 186 रुग्णांपैकी 2 लाख 41 हजार 511 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 306 आहे. कोरोनाबाधित एकूण 6 हजार 369 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 2 हजार 723 रुग्णांपैकी 1 लाख 96 हजार 897 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 786 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 40 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 98 हजार 968 रुग्णांपैकी 1 लाख 93 हजार 395 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 229 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 344 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 6 हजार 427 रुग्णांपैकी 2 लाख 452 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 188 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 787 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 726 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 518, सातारा जिल्ह्यात 77, सोलापूर जिल्ह्यात 80, सांगली जिल्ह्यात 39 तर कोल्हापूर जिल्ह्यात 12 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 805 आहे. पुणे जिल्हयामध्ये 536, सातारा जिल्हयामध्ये 77, सोलापूर जिल्हयामध्ये 124, सांगली जिल्हयामध्ये 43 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 25 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 कोटी 75 लाख 74 हजार 882 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 20 लाख 3 हजार 686 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
( टिप :- दि. 13 ऑक्टोबर 2021 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )