पुणे (रोखठोक महाराष्ट्र न्युज ऑनलाईन)
राजाभाऊ होले यांनी प्रामाणिकपणे लोककल्याण प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजाची सेवा केली,शिवसेना मजबूत केली,प्रत्येक निवडणुकीत मोलाची साथ दिली,आता सर्वानी त्यांच्या पाठीशी पुढील वाटचालीत उभे राहिले पाहिजे असे मत माजी जलसंपदा राज्यमंत्री विजयबापू शिवतारे यांनी तुकाई दर्शन येथे बोलताना व्यक्त केले.
लोककल्याण प्रतिष्ठानच्या वतीने यंदाचा १९ वा “लोककल्याण भूषण”-२०२१ पुरस्कार सामाजिक कार्यकर्त्या निता भोसले यांना तुकाई दर्शन हडपसर येथे प्रदान करण्यात आला.कल्पना भामे यांनी निता भोसले यांना साडी-चोळी देऊन ओटी भरली.”लोककल्याण भुषण” पुरस्कारार्थ मा.राज्यमंत्री विजय बापू शिवतारे यांच्या हस्ते मानचिन्ह तर मानपत्र लोककल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजाभाऊ होले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले,यावेळी विजय बापू शिवतारे हे बोलत होते.
लोककल्याण प्रतिष्ठानच्या वतीने मा.राज्यमंत्री विजयबापू शिवतारे यांना प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजाभाऊ होले यांच्या हस्ते “लोककल्याण गौरव” स्मृती चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी लोककल्याण प्रतिष्ठानचे मा.सचिव सचिन गायकवाड हे सिरम कंपनीच्या युनियन संचालकपदी निवडून आल्याबद्दल विजयबापू शिवतारे यांच्या हस्ते त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला.
व्यासपिठावर श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष विकास रासकर, शिवसेना पुणे शहर समन्वयक बाजीराव सायकर, पुरंदर हवेली विधानसभा उपाध्यक्ष महेश हरपळ, युवासेना उपजिल्हाप्रमुख शादाब मुलाणी, महिला आघाडी, शहर समन्वयक प्रा.विद्या होडे, फुरसुंगी प्रभाग प्रमुख बाळासाहेब हरपळे, संदीप गद्रे, पंकज भारती, राहुल पवार, पांडुरंग शेंडे, अविनाश गोडसे, अंकुश थोपटे आदि मान्यवर उपस्थित होते.
लोककल्याण पुरस्कार हा थोरामोठ्यांनी पुढील सामाजिक वाटचालीसाठी दिलेला आशीर्वाद असून जेष्ठांच्या सेवेकरिता अजून जोमाने काम करणार असल्याचे यावेळी लोककल्याण भूषण पुरस्काराच्या मानकरी निताताई भोसले यांनी सांगितले.
समाजसेवेसाठी पैसा महत्वाचा नसून प्रामाणिक हेतू,आणि सामाजिक बांधिलकीची तळमळ महत्वाची आहे, हे राजाभाऊ होले यांनी लोककल्याण प्रतिष्ठानच्या माध्यमातून सेवा कार्य करत सिद्ध केले आहे असे गौरवोद्गगार विकास अण्णा रासकर यांनी यावेळी बोलताना काढले.
समाजाच्या हितासाठी अहोरात्र झटणाऱ्या व्यक्तींचा मागील 23 वर्षांपासून लोककल्याण प्रतिष्ठान गौरव करत आहे, विविध सामाजिक उपक्रम वर्षभर राबवले जातात, लोककल्याण परिवाराच्या या सेवा कार्यात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी राजाभाऊ होले यांनी केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रदिप जगताप प्रास्ताविक उपाध्यक्ष दिलीप भामे आभार कार्याध्यक्ष हरिश्चंद्र कुलकर्णी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीते साठी प्रतिष्ठानचे सचिव विनोद सातव, इंद्रपाल हत्तरसंग, प्रभाकर शिंदे, जनार्दन चव्हाण, प्रविण होले,चंद्रकांत वाघमारे आदिंनी प्रयत्न केले.