पुणे (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन)
मारुती आबा तुपे यांनी सुरू केलेली अभ्यासिका होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरेल असे प्रतिपादन भाजपच्या राष्ट्रीय सचिव माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
हडपसर, सातववाडी, काळेबोराटे नगर, प्रभाग क्रमांक 23 येथे महानगरपालिकेच्या वतीने नगरसेवक मारुती आबा तुपे यांच्या प्रयत्नातून युपीएससी-एमपीएससी व इतर सर्व स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी अभ्यासिका उभारण्यात येणार आहे. त्याचे भूमिपूजन भाजपच्या राष्ट्रीय सचिव माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्या बोलत होत्या.
याप्रसंगी आमदार माधुरी मिसाळ, नगरसेवक मारुती आबा तुपे, अमित गायकवाड, राजू महाडिक, संकेत झेंडे, सतीश भिसे, राजू बडे, ओंकार तुपे, सतीश केंद्रे, योगेश ढोरे, गोरख काळे, मारुती आबा तुपे योगा ग्रुपचे सदस्य भाजप पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
पंकजा मुंडे पुढे बोलताना म्हणाल्या की स्वर्गीय मुंडे साहेबांना कुठल्याही कामासाठी कधीही मूर्त लागत नव्हता साहेब आले की तोच मूर्त ठेवून त्यावर विकास कामे केली जात असत आज त्या प्रमाणे नगरसेवक आबा तुपे यांनी कोणत्याही प्रकारचा मुहूर्त किंवा वेळ न पाहता मला बोलावले अभ्यासिकेचे भूमिपूजन केले आहे.
यूपीएससी-एमपीएससी अभ्यासक्रम करण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांची गैरसोय होते, आपल्या समाजातील सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना याचा लाभ व्हावा यासाठी अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेऊन करिअर करावे असे आवाहन नगरसेवक मारुती आबा तुपे यांनी केले.