पुणे

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये मिशन युवा स्वास्थ्य कोविड मोफत लसीकरण अभियान संपन्न

हडपसर 

      प्रत्येकाने वेळेवर लस घेतली पाहिजे. लस घेतल्यानंतरही काळजी घ्या .यापुढे आपणास covid-19 बरोबर आयुष्य जगावे लागणार आहे. जगातील काही देशांमध्ये तिसरी लाट आली आहे. आपणही दिवाळीचा आनंद घेताना पथ्ये पाळा . गर्दी करू नका .फटाके विरहीत दिवाळी साजरी करा .प्रदूषणमुक्त दिवाळीचा उत्सव साजरा करूया , असे विचार, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष, महाविद्यालय विकास समितीचे प्रमुख, मा. आमदार चेतनदादा तुपे यांनी मांडले. ते एस .एम. जोशी कॉलेजमध्ये बोलत होते. एन .एस .एस व एन. सी. सी. , हेल्थ केअर सेंटर व पुणे महानगरपालिका यांचे संयुक्त विद्यमाने मिशन युवा स्वास्थ्य covid-19 मोफत लसीकरण अभियानाच्या उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. पाहुण्यांचा परिचय व स्वागत प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी केला. त्यांनी महाविद्यालयातील विविध उपक्रमांचा आढावा घेतला. अध्यक्षस्थानी पुणे महानगरपालिकेचे विभागीय अधिकारी डॉ. दिनेश भेंडे होते. ते म्हणाले की, मास्कचा वापर करा. वारंवार हात धुवा. आपणच आपली काळजी घ्या .असे ते म्हणाले .याप्रसंगी फटाके विरहीत दिवाळीच्या पत्रकाचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य मा. दिलीप (आबा) तुपे ,डॉ. शंतनु जगदाळे, उपप्राचार्य प्रा. संजय जडे, डॉ. संजय जगताप, क्रीडा विभाग प्रमुख दत्ता वसावे, एन. सी .सी .ऑफिसर रमेश गावडे ,सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. लसीकरणासाठी महाविद्यालयातील विद्यार्थिनी व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. रंजना जाधव यांनी केले. आभार डॉ. अशोक पांढरबळे यांनी मानले.