पुणे

कवींनी विविध रसांच्या कविता सादर कराव्यात – विनोद अष्टुळ

कवींनी त्याच त्या कविता सादर करून एकच विचार समाजापुढे न ठेवता सामाजिक प्रबोधनासाठी आणि मराठी भाषा संवर्धनासाठी विविध रसांच्या कविता सादर कराव्यात म्हणजे कवींचा कस लागून खऱ्या अर्थाने मायमराठीची सेवा घडेल.असे मत साहित्य सम्राट पुणे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनोदजी अष्टुळ यांनी व्यक्त केले.
हे साहित्य सम्राट पुणे या संस्थेच्या विविध उपक्रमामधील कवींचा वाढदिवस या उपक्रमात जेष्ठ कवी प्रल्हाद शिंदे यांच्या ६९ व्या वाढदिवसानिमित्त मधूबन मंगल कार्यालय पुणे सोलापूररोड येथे आयोजित केलेल्या १२५ व्या कविसंमेलनात अष्टुळ बोलत होते.
हे कविसंमेलन सुप्रसिद्ध कवी संतोष गाढवे यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रमुख अतिथी सुप्रसिद्ध कवी बाळासाहेब गिरी यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
या कविसंमेलनात दिग्गज तीस कवी कवयित्रींनी आपल्या बहारदार कविता गझल आणि गीते सादर केली.यामध्ये ,किशोर टिळेकर,बा.ह.मगदूम,शिवाजी उराडे, सीताराम नरके,उद्धव महाजन, अनंत राऊत,उमा लुकडे,कांचन मुन, आशाताई शिंदे, जान्हवी नामुगडे, अशोक शिंदे, वैभव होले, शहाजी वाघमारे,नकुसा लोखंडे,स्वाती दरेकर, आम्रपाली धेंडे,सुभाष बडदे महाराज, अंकुश जगताप,चंद्रकांत जोगदंड, आनंद गायकवाड, बाबाजी शिंदे, ऍड.रामदास घोलप,उषा बोऱ्हाडे,सचिन शिंदे, राहुल जाधव, प्रल्हाद शिंदे इत्यादींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
कविसंमेलनाचे सदाबहार सूत्रसंचालन रानकवी जगदीप वनशिव यांनी केले तर सूर्यकांत नामुगडे यांनी सर्वांचे आभार मानले.