हवेली प्रतिनिधी – अमन शेख
एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या एमआयटी स्कूल ऑफ इंजिनीरिंगचे प्राध्यापक अरविंद मधुकर जगताप यांना “कॉम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग” या विषयाची पीएच. डी. पदवी नुकतीच प्रदान करण्यात आली.
अरविंद जगताप यांनी चेन्नई येथील वेलटेक रंगराजन डॉ. शकुंतला आर अँड डी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विद्यापीठातून “एनर्जी ॲप्रिसिएशन मोमेंट फॉर टारगेट कव्हरेज अँड नेटवर्क कंनेक्टिविटी इं मोबाईल सेन्सर नेटवर्क फोर क्रॉप वीड क्लासिफिकेशन” हा शोधप्रबंध सादर केला होता. या शोधप्रबंधासाठी त्यांना डॉ. एम. गोमथी यांचे मार्गदर्शन लाभले.
पीएच. डी. प्रदान झाल्याबद्दल एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष आणि कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड, संचालक डॉ. राहुल मोरे, प्राचार्य डॉ. किशोर रवांदे, संगणक विभागाचे प्रमुख डॉ. रजनीश कौर बेदी, डॉ. रेखा सुगंधी यांनी अरविंद जगताप यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.