पुणे

आद्यक्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारक उभारण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य- डॉ. नीलम गोऱ्हे आद्यक्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे जयंती निमित्त अभिवादन

पुणे, दि. 14 :- आद्यक्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांना त्यांच्या जयंती निमित्त विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. यावेळी लहुश्री पुरस्काराने अनेकांचा गौरव करण्यात आला.

बालगंधर्व रंगमंदिर येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत आद्यक्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे स्मारक समितीच्या माध्यमातून लहूश्री सन्मान सोहळयाचे आयोजन करण्यात आले. आमदार निलेश लंके, आमदार राजू आवळे, सचिन अहिर, गजानन थरकुडे, श्री. रमेश बागवे, अविनाश साळवे, नगरसेवक बाबुराव चांदोरे, प्रशांत जगताप, सामाजिक न्याय विभागाचे उपायुक्त रमेश कदम, संजय मोरे, पृथ्वीराज सुतार, बाळासाहेब भांडे आदी उपस्थित होते.

उपसभापती श्रीमती गोऱ्हे यांनी लहुजी वस्ताद साळवे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. श्रीमती गोऱ्हे म्हणाल्या, आद्यक्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकासाठी पाठपुरावा करून स्मारक उभारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन. मातंग समाजातील विद्यार्थ्यांचे शिक्षण, शिष्यवृत्ती अशा प्रश्नांना प्राधान्य दिले पाहिजे.याबाबतच्या सर्व अडचणी सोडविण्यासाठी कायम पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी क्रांतिगुरु लहुजी पुरस्काराने अनेकांनाचा गौरव करण्यात आला.

शिवसेना संपर्कप्रमुख माजी मंत्री सचिन अहिर यांनी मुंबई येथील अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी शिवसेना कटिबद्ध आहे. तसेच लहुजी साळवे स्मारकासाठी देखील निधीची कमतरता होऊ देणार नाही असे त्यांनी सांगितले.