पुणे

साने गुरुजी आरोग्य केंद्रामध्ये ऑक्सिजन जनरेशन प्लँट कार्यान्वयीत

कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमध्ये सर्वत्र ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. हॉस्पिटलमधील रुग्णांसाठी आवश्यक असणारा ऑक्सिजनचा पुरवठा सहज उपलब्ध व्हावा यासाठी रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो, विवेक व्यासपीठ यांच्या सहकार्याने ह्या प्रकल्पाची सुरुवात झाली.
ऑलस्टेट इंडिया, युनायटेड वे ऑफ बेंगलुरु व एसीटी यांच्या संयुक्त विद्यमाने रुपये ५४ लाख खर्चाचा प्रत्येक मिनिटाला १२५ लिटर क्षमतेचा ऑक्सीजन प्लँट हॉस्पिटलला देणगी म्हणुन दिला. महाराष्ट्र आरोग्य मंडळचे साने गुरुजी आरोग्य केंद्रांमध्ये ऑक्सिजन जनरेशन प्लँटचे उदघाटन श्री. चेतन गर्गा, मॅनेजिंग डायरेक्टर, ऑल स्टेट इंडिया बेंगलुरु यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र आरोग्य मंडळाचे सचिव श्री. अनिल गुजर, सदस्य, श्री. सिद्धार्थ गुजर, श्री. तनय केडियाल, चीफ ऑपरेटिंग ऑफिसर, श्री. राहुल मेहता, डॉ. सतीश कट्टीमनी, श्री. केदार मेथेकर, श्री. अक्षय शर्मा महाविद्यालयातील विविध विभागाचे विभागप्रमुख व इतर मान्यवर उपस्थित होते. संस्थेचे सचिव, श्री. अनिल गुजर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. चंद्रशेखर महाजन यांनी केले.