पुणे : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांची फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या गोवा येथे झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली असून फेडरेशनच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध चित्रपट निर्माते टी. पी. अग्रवाल यांची निवड करण्यात आली आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया ही देशभरातील प्रादेशिक व राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या विविध संघटनांची शिखर संस्था आहे. आज गोवा येथे देशभरातील विविध संघटनांच्या अध्यक्ष व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मेघराज राजेभोसले यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी चित्रपट ही देशातील सर्वाधिक सदस्य संख्या असलेली प्रमुख संस्था आहे. राजेभोसले यांची उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाल्याने मराठी चित्रपटसृष्टी आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या शिरपेचात मानात आणखी एक तुरा रोवला गेला आहे.
मेघराज राजेभोसले यांची फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड
November 20, 20210
Related Articles
June 17, 20230
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात “करिअर मार्गदर्शन कार्यशाळा” संपन्न
औंध - रयत शिक्षण संस्थेचे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात अंतर्गत गुणव
Read More
August 3, 20210
महाराष्ट्र अस्थिरोग संघटनेच्या वतीने “स्वतःला वाचवा इतरांना वाचवा मोहीम” ; एक लाख प्रशिक्षित जीवरक्षक तयार करण्याचा मानस
पुणे (प्रतिनिधी)
सन २०१२ पासून भारतीय अस्थिरोग संघटना, प्रतिवर्षी ४ ऑगस्ट र
Read More
November 7, 20220
शिक्षकेतरांचे प्रश्न सोडविण्यासाठी संघटना कटीबद्ध – शिवाजी खांडेकर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर महामंडळाचे राज्य सरकार्यवाह शिव
Read More