पुणे

 पोलीस भरती परीक्षामध्ये डमी बसुन देत होता परीक्षा पोलिसांनी ठोकल्या बेड्या

 प्रतिनिधी स्वप्निल कदम  

पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या पोलीस भरती प्रक्रियेच्या लेखी परीक्षेत डमी उमेदवार बसवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी मुख्य परीक्षार्थी आणि डमी उमेदवाराला अटक केली आहे बावधन परिसरातील एका परीक्षा केंद्रावर शुक्रवारी दिनांक 19 ही घटना घडली आहे परीक्षा संपण्यास अवघे पाच मिनिट बाकी असताना डमी परीक्षार्थी चा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे या घटनेमुळे पारदर्शक भरती प्रक्रियेला गालबोट लागले आहे .मुनाफ हुसेन बेग असे डमी परीक्षार्थी तरुणाचे नाव आहे. प्रकाश रामसिंग धनावत असं मुख्य परीक्षार्थी चे नाव आहे दोघांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील 720 पोलीस शिपाई पदासाठी शुक्रवारी दि 19 लेखी परीक्षा घेण्यात आली दरम्यान बावधन येथील अरिहंत इन्स्टिट्यूट परीक्षा केंद्रावर परीक्षेचा कालावधी संपण्यास अवघे पाच मिनिट बाकी असताना डमी परीक्षार्थी चा पोलिसांनी पर्दाफाश केला परीक्षार्थी मुनाफ आणि प्रकाश दोघे काही प्रमाणात सारखेच दिसतात असे पोलिसांनी सांगितले त्यामुळे पोलिसांची गफलत झाल्याने डमी परीक्षार्थी मुनाफ हा परीक्षा केंद्राच्या आत येण्यास यशस्वी झाला त्यानंतर पोलिसांना संबंधित केंद्रावर डमी परीक्षार्थी बसविण्यात आल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला त्यावेळी मुनाफ हातो डमी परीक्षार्थींना नाही असे वारंवार सांगत होता परंतु त्याला मुख्य परीक्षार्थी प्रकाश च्या तीन सह्या करण्यास सांगितले तेव्हा त्यात तफावत आढळली त्याला ताब्यात घेण्यात आले दरम्यान मुख्य परीक्षार्थी धनवान हा परीक्षा केंद्राच्या जवळच असल्याने त्याला देखिल ताब्यात घेण्यात आले याप्रकरणी दोघांना अटक केली आहे पोलीस उपनिरीक्षक महेंद्र गाढवे तपास करत आहेत