पिंपरी : कौटुंबिक कलहातून पोटच्या तीन वर्षाच्या चिमुरड्याला विषारी औषध पाजून खून करणाऱ्या आईला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे सत्र न्यायाधीश जी पी अग्रवाल यांनी हा निकाल दिला मुलाचा खून केल्यानंतर आईनेही विष घेऊन गळफास लावून घेण्याचा प्रयत्न केला पिंपरी चिंचवड मधील तळवडे येथे पाच वर्षांपूर्वी ही घटना घडली होती. स्वाती विक्रम माळवदकर वय वर्ष 25 रा.बोरकर वाडी सुपा शिक्षा सुनावलेल्या निर्दयी महिलेचे नाव आहे स्वाती यांचे दीर श्रीकांत माळवदकर वय 30 यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.2ऑगस्ट 2016 मध्ये ही घटना घडली होती .याबाबतची माहिती अशी की फिर्यादी पत्नी भाऊ विक्रम वहिनी स्वाती पुतण्या निशिगंध आणि आई-वडिलांसह एकत्र राहत होते .स्वातीला ते मान्य नसल्याने तिचे सासू-सासरे गावी राहत होते .सर्वांनी एकत्र राहावे अशी विक्रमची इच्छा होती .त्यामुळे विक्रम आणि स्वाती यांच्यात वाद होत होता घटनेच्या दिवशी विक्रमने स्वातीला फोन केला असता तिने तो उचलला नाही .त्यामुळे विक्रमने फिर्यादी ना घरी जाण्यास सांगितले फिर्यादी घरी आले असता निशिगंध चटईवर चादर पांघरुन झोपलेला आणि स्वाती बेशुद्ध पडलेल्या दिसल्या फिर्यादीने दोघांना रुग्णालयात दाखल केले .डॉक्टरांनी तपासणी केली असता त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले स्वाती ला काही दिवसांनी डिस्चार्ज मिळाला या खटल्याचे कामकाज सरकारी वकील लीना पाठक यांनी पाहिली त्यांना एडवोकेट मनोज बिडकर यांनी मदत केली.
पोटच्या तीन वर्षाच्या चिमुरड्याला विषारी औषध पाजून खून करणाऱ्या आईला जन्मठेपेची शिक्षा
November 20, 20210
Related Articles
December 16, 20230
पूर्व हवेलीतील सोरतापवाडी येथे रोपवाटिका व्यवस्थापन शेतकरी प्रशिक्षण वर्ग संपन्न …
प्रतिनिधी- स्वप्निल कदम
मौजे सोरतापवाडी(गुंजाळ मळा) ता.हवेली जि.पुणे येथे द
Read More
May 30, 20240
“मराठवाडा मित्रपरिवाराचा आदर्श माता-पिता सन्मान सोहळा संपन्न… जिजाऊंच्या शिकवणीमुळेच शिवराय रयतेचे राजे झाले, शहाजी – जिजाऊंसारखे पालक व्हा!: प्रा. डॉ. विश्वनाथ कराड
पुणे : "आपल्या सर्वांच्या जडणघडणीमध्ये आपल्या आई वडिलांची भूमिका महत्त्वाच
Read More
February 11, 20230
शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोशल मीडियावर तलवार,कोयत्यासह रिल्स बनवणाऱ्या चौघांना अटक
प्रतिनिधी- स्वप्नील कदम
शिक्रापूर- शिक्रापूर सोशल मिडीयावर तलवार व कोयत्य
Read More