हवेली प्रतिनिधी :-अमन शेख। हवेली तालुक्यातील लोणी काळभोर ग्रामपंचायतमध्ये ५ टक्के दिव्यांग कल्याण निधीतून ११२ लाभार्थींना दैनंदिन वापरातील उपयोगी सहित्य खरेदी करण्यासाठी प्रत्येकी पाच हजार एकशे बेचाळीस रुपयेप्रमाणे आर्थिक मदतीचे धनादेश वाटप करण्यात आले.
समाजात राहताना आपण समाजाचे काही देणे लागतो. आणि हे देणे आपण योग्य वेळेस योग्य व्यक्तीस पोहचवायला हवे, हाच आदर्श डोळ्यांसमोर ठेऊन लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीतील
दिव्यांग कल्याण निधीतील ५ टक्के रक्कम गावातील दिव्यांग व्यक्तींना देऊन हातभार लावला आहे.
या वेळी लोणी काळभोर ग्रामपंचायतीचे सरपंच राजाराम काळभोर, उपसरपंच संगीता काळभोर, ग्रा.पं. सदस्या सविता जगताप, ग्रा.पं. सदस्य योगेश काळभोर, नागेश काळभोर, गणेश कांबळे, माजी उपसरपंच राजेंद्र काळभोर, अमित काळभोर, सागर काळभोर, प्रहार सघंटनेचे हवेली अध्यक्ष मनोज काळभोर, ग्रामविकास अधिकारी एस. एम. गायकवाड, तसेच लाभार्थी बांधव माहिला उपस्थित होते.