पुणे

उरळी कांचन येथे दुचाकीवरील एकाचा कंटेनरच्या धडकेने जागीच मृत्यू

प्रतिनिधी – स्वप्नील कदम

कंटेनरच्या धडकेत दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला .पुणे-सोलापुर महामार्गावरील (उरुळी कांचन ता. हवेली) येथील तळवडी चौकात रविवारी (दिनांक 21 )सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. गंगाधर शंकर ननावरे (वय 60 रा.औरंगाबाद पूर्ण पत्ता माहिती नाही .)असे अपघातात ठार झालेल्या चे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार नन्नवरे हे शिंदवणे( ता. हवेली )येथील नातेवाईकांना भेटण्यासाठी आले होती .रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांचे नातेवाईक त्र्यंबक एगडे हे त्यांना घेण्यासाठी दुचाकीवरुन तळवडी चौकात आले होते .दरम्यान चौकातून शिंदवणे बाजूला जाताना रस्ता ओलांडताना ननावरे जात असलेल्या दुचाकीला कंटेनरने धडक दिली. यात ननावरे हे रस्त्यावर पडले यावेळी कंटेनर चे पाठीमागील चाक हे त्यांच्या मानेला घासून गेले .त्यांना तातडीने लोणी काळभोर येथील रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अधिक तपास लोणी काळभोर पोलिस करत आहेत.