हवेली प्रतिनिधी – अमन शेख
एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाची विद्यार्थिनी शेहनाज शेख हिने मिस नुकत्याच झालेल्या इंडिया आयकॉन 2021 या स्पर्धेत विजेतेपद पटकावले. शेहनाज शेख हिने सप्टेंबर महिन्यात मिस पुणे एलिट- E3 चे विजेतेपद पटकावले होते. मिस इंडिया आयकॉन 2021 सह मिस बॉडी ब्युटीफुल या स्पर्धेमध्ये सुद्धा विजेतेपद मिळवले आहे. या स्पर्धेचे आयोजन नाइट्स रेकॉर्ड आणि टीन टियारा क्वीन, संस्थापक मनिंदर सिंग यांनी केले होते .अंतिम फेरी हरियाणातील अंबाला येथे झाली. महाअंतिम फेरीत परिचय, प्रतिभा आणि प्रश्नोत्तर फेरी अशा तीन फेऱ्यांचा समावेश होता. या स्पर्धेत एकूण 300 स्पर्धकांनी भाग घेतला होता आणि केवळ 60 स्पर्धकांनी महाअंतिम फेरीत प्रवेश केला होता त्यामध्ये परिचय आणि वैयक्तिक प्रश्नोत्तरांच्या फेरीनंतर टॉप 30 स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. शेवटी, एक समान प्रश्न आणि उत्तर फेरी होती. सुश्री शेख यांनी सर्व फेऱ्या पार केल्या आणि मिस इंडिया आयकॉन 2021 आणि मिस बॉडी ब्युटीफुल विजेती ठरली.
सुश्री शेहनाझ ओरिसातील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील असून ती एमआयटी स्कूल ऑफ ह्युमॅनिटीजमध्ये बीए (ऑनर्स) इंग्रजीच्या व्दित्तीय वर्षाची विद्यार्थिनी आहे. श्री शेहनाझ म्हणाली, की विद्यापीठाच्या व्यवस्थापन आणि प्राध्यापकांनी दिलेले समर्थन आणि मार्गदर्शन यामुळे हे विजेतपद मिळवण्यात मदत झाली असल्याचे सांगितले.
या यशाबद्दल एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष आणि कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड, स्कूल ऑफ ह्युमॅनिटीजच्या अधिष्ठाता डॉ. आसावरी भावे, स्कूल ऑफ होलिस्टिक डेव्हलपमेंटचे संचालक डॉ. अतुल पाटील यांच्यासह सर्व प्राध्यापकांनी यांनी सेहनाज शेखनी हिचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.