हवेली प्रतिनिधी :-अमन शेख पुणे : शाळेवर सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीसह त्याच्या मित्रावर काठी आणि बांबूने जोरदार मारहाण करण्यात आली. या घटनेत सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला असून त्याचं मित्र गंभीर जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास कोंढवा पोलिस स्थानकाच्या हद्दीतील येवलेवाडी येथे घडली. जखमीचा हात मोडला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार चालू आहेत. कोंढव्यात खून झाल्यानं प्रचंड खळबळ उडाली आहे.
रवि कचरू नागदिवे (वय 50, रा. देवाची उरुळी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर बालाजी चव्हाण (रा. वडकी) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रवी नागदिवे हा उरुळी देवाची येथील एका शाळेवर सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. तो आणि त्याचा मित्र बालाजी चव्हाण हे दोघेही आज येवलेवाडी परिसरामध्ये आले होते. त्यावेळी त्यांना अज्ञात व्यक्तींकडून बांबू आणि काठ्यांनी जबर मारहाण करण्यात आली.
या मारहाणीत नागदिवे याचा जागीच मृत्यू झाला. तर, चव्हाण जखमी झाला असून त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना आज संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. आरोपींचा माग काढण्यास पोलिसांची पथके रवाना करण्यात आली असून हा प्रकार अनैतिक संबंधामधून घडल्याचा प्राथमिक अंदाज वरिष्ठ निरीक्षक सरदार पाटील यांनी व्यक्त केला आहे.