प्रतिनिधी स्वप्नील कदम
लोणी काळभोर – उरळीकांचन येथे काही दिवसांपूर्वी वाळू व्यावसायिक संतोष जगताप यांचा खून करणाऱ्या तसेच ोणी काळभोर परिसरात गुन्हेगारी कृत्य करून दहशत पसरवणार्या आदलिंगे टोळीचया म्होरक्या सह सात जणांवर पोलीस आयुक्तांनी मोकाची कारवाई केली आहे आयुक्त गुप्ता यांनी गेल्या वर्षभरात केलेली ही 60 कारवाई आहे. यात टोळी प्रमुख महादेव बाळासाहेब आदलिंगे( वय 28 रा.जुनी तांबेवस्ती, दत्तवाडी, उरुळी कांचन, हवेली) स्वागत बापू खैरे (वय 25 राहणार उरळीकांचन )( मयत टोळी सदस्य) पवन गोरख मिसाळ ( वय 29 रा. दत्तवाडी भवरापुर रोड, उरुळी कांचन) उमेश सोपान सोनवणे, वय-35, रा. मूपो.राहू, ता. दौंड) अभिजीत अर्जुन यादव (वय 22 रा, मेडद, ता. बारामती) आकाश उर्फ बाळू जगन्नाथ वाघमोडे( वय 28 रा, पटेल चौक कुर्डूवाडी ता.माढा जिल्हा सोलापूर) महेश भाऊसाहेब सोनवणे वय 28 रा. भांडवाडी वस्ती,राहू ता. दौंड) असे मोक्काची कारवाई केलेल्यांची नावे आहेत. या टोळीवर पुणे शहर ,पुणे रेल्वे ,पुणे ग्रामीण ,पिंपरी चिंचवड ,सोलापूर व उस्मानाबाद ,जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात 15 गुन्हे दाखल आहेत टोळीवर प्रतिबंधक कारवाई करूनही त्यांच्या गुन्हेगारी कारवाया सुरूच होत्या त्यामुळे त्यांच्यावर मोक्काची कारवाई करण्याचा प्रस्ताव लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी ,यांनी परिमंडळ 5 चे पोलीस उपायुक्त नम्रता पाटील ,यांच्यामार्फत अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग नामदेव चव्हाण, यांच्याकडे सादर केला होता .सदर प्रस्तावाची छाननी करून चव्हाण यांनी आरोपीवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे .पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग नामदेव चव्हाण, परिमंडळ 5 च्या पोलीस आयुक्त नम्रता पाटील, आदींच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे ,पोलीस अंमलदार गणेश सातपुते ,संदीप घनवटे, गणेश भापकर ,मल्हारी ढमढेरे , यांनी आधी ही कारवाई केली आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस आयुक्त हडपसर विभाग कल्याणराव विधाते करत आहेत.