प्रतिनिधी स्वप्नील कदम
पिंपरी : तरुणीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवड येथे उघडकीस आली आहे .आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. सचिन बलदेव शर्मा असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे .तो मूळचा पंजाब राज्यातील पटियाला येथील रहिवासी आहे .पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित, तरुणी अन् आरोपीची एका मेट्रोमोनीअल साईट वर ओळख झाली होती. आरोपीने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून तिला विविध ठिकाणी घेऊन गेला होता. आरोपीने पीडितेला गुंगी येणार औषध देऊन तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला आहे. पीडित तरुणी बेशुद्ध अवस्थेत असतानाच आरोपीने तिला आपल्या वासनेची शिकार बनवली आहे. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या हा धक्कादायक प्रकाराला कंटाळून पीडितेने अखेर पोलिसात धाव घेतली आहे. पोलिसांनी आरोपीवर बलात्कार सह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पिंपरी पोलीस तपास करत आहे.