महाराष्ट्र

तुम्हालाही कमी रेशन मिळत असेल, तर दुकानदाराविरुद्ध तक्रार नोंदवू शकता

प्रतिनिधि : स्वप्नील कदम 

महाराष्ट्र : शिधापत्रिका हे असं महत्त्वाचं कागदपत्र (डॉक्युमेंट) आहे, ज्याद्वारे तुम्हाला स्वस्तात रेशन मिळते. अनेक वेळा आपण पाहतो की रेशन दुकानदार शिधापत्रिकाधारकांना रेशन देण्यास नकार देतात किंवा वजन करून कमी रेशन देतात. असं काही तुमच्या बाबतीत घडलं तर अजिबात काळजी करू नका. शासनाने शिधापत्रिकाधारकांसाठी राज्यवार हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. तुम्हालाही कमी रेशन मिळत असेल, तर तुम्ही या क्रमांकांवर संपर्क साधून संबंधित दुकानदाराविरुद्ध तक्रार नोंदवू शकता.

महाराष्ट्र टोल फ्री क्रमांक- 1800-22-4950

सरकारनं भ्रष्टाचार कमी करण्यासाठी आणि अन्नधान्याचं वितरण सुनिश्चित करण्यासाठी तक्रार हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. जेणेकरून, अनुदानित रेशन गरिबांपर्यंत पोहोचेल. जर कोणत्याही शिधापत्रिकाधारकाला त्यांचा अन्न कोटा मिळत नसेल, तर ते टोल फ्री हेल्पलाइन नंबरवर कॉल करून त्यांची तक्रार नोंदवू शकतात