ठाणे

यशवंत ग्राहक आधार प्रतिष्ठान, महाराष्ट्र प्रदेश वतीने शनिवार दिनांक 27 11 2019 रोजी ठाणे विभागतील नियुक्त्या आढावा बैठकीतून करण्यात आल्या

प्रतिनिधी: स्वप्नील कदम

अजित भाई अन्सारी यांनी सर्वांचे स्वागत करून कार्यक्रमाची सूत्रे सन्मानीय अध्यक्षांच्या हाती सोपविण्यात आली.

या वेळी या अभ्यास वर्गामध्ये 20 जुलै 2020 चा नवीन आलेला ग्राहक कायदा, त्याच पद्धतीने यशवंत चे कामकाज, शासकीय कामकाज व सामाजिक कामकाज यावर चर्चा विनिमय करून ग्राहकांचे हक्क ,अधिकार व तसेच कर्तव्याची जाणीव आणि ग्राहकांचे प्रश्न सोडवण्याची कार्यप्रणाली तसेच रचनात्मक काम उभी करण्यासाठी शासन स्तरावर मैत्रीपूर्ण संबंध व मदत, लोकप्रतिनिधी उचित सहकार्य आणि मीडियाशी मैत्री करून शोषणमुक्त महाराष्ट्र उभा करण्यासाठी हा एक संकल्प हाती घेतला असून ग्राहक शक्ती + शासन दंडशक्ती + लोकप्रतिनिधींचे उचित सहकार्य + मीडियाशी मैत्री पूर्व संबंध = शोषण मुक्त महाराष्ट्र उभारणी
हे समीकरण डोळ्यासमोर ठेवून शासकीय सर्व योजना घराघरात आणि घरातील प्रत्येकासाठी योजना कश्या पद्धतीने आणता येतील यासाठी गाव शाखा ,शहर वार्ड शाखा, तालुके मेळावे ,शेतकरी ग्राहक मेळावे , शासकीय विविध खात्याचे प्रदर्शने, शालेय विद्यार्थी यांना विद्यालयातून ग्राहक जागृती करणे, इत्यादी चर्चा करून तसेच ग्राहकांच्या गरजा लक्षात घेता ग्राहकांना अधिकृत व शासनाच्या चौकटीत राहणाऱ्या सेवा या मिळवून देण्यासाठी प्राधान्य देणे, अशा अनेक विषया संदर्भात विविध चर्चा अंती शेवटी यशवंत ग्राहक आधार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व माजी अध्यक्ष ग्राहक कल्याण सल्लागार समिती महाराष्ट्र शासन ( कॅबिनेट मंत्री )सुर्यकांत सुखदेव गवळी यांनी चर्चा विनिमय करून व ॲड सौ.अनिताताई सुर्यकांत गवळी अध्यक्षा – यशवंत ग्राहक आधार प्रतिष्ठान – महाराष्ट्र प्रदेश (महिला विभाग) यांच्या मान्यतेने ग्राहक चळवळीची आवड असणाऱ्या तसेच समाजसेवेचे कार्य करणाऱ्या महिला पुरुषांची सविस्तरपणे चर्चा करून सर्वानुमते खालील नियुक्त्या करण्यात आल्या.

तसेच राज्याच्या महिलाध्यक्षा मा. अङॅ. अनिता सुर्यकांत गवळी यांनी ग्राहकांच्या सुरक्षेबाबत ऑनलाइन खरेदी विक्री व्यवहाराबाबत कशी काळजी घ्यावी याबाबत माहितीपर मार्गदर्शन केले.

यावेळी खालील महिला व पुरुष मान्यवर यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या ….. माननीय निवृत्त न्यायाधीश डॉ. संतोषकुमार रामनारायणलाल जयस्वाल साहेब यांची महाराष्ट्र प्रदेशावर – सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली .
तर  दिपक मधुकर बिर्जे यांची प्रवक्ता – महाराष्ट्र प्रदेशावर नियुक्ती करण्यात आली तर  सुरेश संपत संकपाळ यांची संघटक – मुंबई विभागावर तर दीपक चिंधु साखरे यांची सदस्य – महाराष्ट्र प्रदेशावर तर नंदकुमार काशिनाथ भावरकर यांची सदस्य – महाराष्ट्र प्रदेशावर तर सुरेश संपत संकपाळ यांची संघटक मुंबई विभागावर तर डॉ. जे. एन. बोगा यांचे सह संघटक – मुंबई विभागावर तर  राकेश रामचंद्र होडबे यांची संघटक – मुंबई उपनगर विभागावर तर  दगडू राजाराम जाधव यांची संघटक म्हणून दक्षिण मध्य मुंबई जिल्हा तर विजय पिराजी पोळ यांची सदस्य – मुंबई विभागावर नियुक्त्या करण्यात आल्या.

तर महिला विभागावर मंगल विजय पोळ यांचे संघटक – धारावी विधानसभा मतदारसंघ तर दीपा दिनेश वैद्य यांची संघटक – माहीम विभागावर तर राधा श्रीनिवास चाटला यांची संघटक – वरळी विधानसभा मतदारसंघावर इत्यादींचे नियुक्त्या करण्यात आल्या.

वरील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे राज्यांकङुन मनापासून सर्वांचे खुप खुप अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा .💐💐💐🙏🏻