पुणे

लाचलुचपत विभागाने केली कारवाई, वाहतूक पोलीस अडकला जाळ्यात

हवेली प्रतिनिधी :-अमन शेख

पुणे शहर वाहतुक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यास लाच घेताना पकडले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले असून तो कर्मचारी लोणी काळभोर वाहतूक विभागात कार्यरत आहे. एका खासगी ट्रॅव्हल्सवर कारवाई न करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेतल्याचे समोर आले आहे या कारवाईने पोलीस दलात खळबळ उडाली आहे, याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे

ताब्यात घेण्यात आलेले सुहास भास्कर हजारे हे लोणी काळभोर वाहतूक विभागात कार्यरत आहेत यातील २७ वर्षीय तक्रारदार हे एका ट्रॅव्हल्स एजन्सीत मॅनेजर म्हणून काम करत आहेत. त्यांच्या एजन्सीकडून स्वारगेट ते सोलापूर अशी बस चालू आहे या ट्रॅव्हल्सवर कारवाई न करण्यासाठी सुहास हजारे यांनी त्यांच्याकडे महिना ६ हजार रुपयांची लाच मागितली होती. याबाबत त्यांनी एसीबीकडे तक्रार केली होती त्याची पडताळणी करण्यात आली. त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, आज लोणी काळभोर येथील कवडीपाट टोल नाक्यावर ५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यातआले.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे,अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत विभागाने केली