हवेली प्रतिनिधी :अमन शेख
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युनिट ६ चे आधिकारी व अंमलदार हे हद्दीमध्ये गस्त करत असताना पो. शि. व्यवहारे व पो. शि. ताकवणे यांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली की, केसनंद रोड , वाघोली येथील एपिक सोसायटी मध्ये एका इसमाने घरामध्ये घुसून एका महिलेवर चाकूने वार करून तिच्या गळयातील सोन्याचे दागिने हिसकावून घेतले आहेत.अशी बातमी मिळाल्याने सदरबाबत गुन्हे शाखा, युनिट ६ चे पोलीस निरीक्षक गणेश माने यांना माहिती दिली असता त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेश दिल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील व पथक यांनी तात्काळ घटनास्थळी जावून लोकांच्या ताब्यातून पळून जाणा-या इसमास ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने आईच्या आजारपणावर उपचार करण्याकरिता सोसायटी मधील फ्लॅटमध्ये पिण्यास पाणी मागण्याचा बहाणा करून महिलेवर चाकूने वार करून जबरी चोरी केल्याचे सांगितले. जखमी महिलेवर डिग्नीटी ९ हॉस्पीटलमध्ये उपचार चालू असून तिने जबरी चोरी करणाया इसमाच्या विरोधात लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास लोणीकंद पोलिस करीत आहेत.
ही कामगिरी गुन्हे शाखा, युनिट ६ चे पोलीस निरीक्षक श्री गणेश माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक निरी. सुधीर टेंगले, पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, नितीन शिंदे, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, प्रतिक लाहिगुडे, ऋषिकेश ताकवणे, ॠषिकेश व्यवहारे, सचिन पवार, ऋषिकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन धाडगे, ज्योती काळे व सुहास तांबेकर यांनी केली आहे.