पुणे

शिधापत्रिकाधारकांना दिलासा आणखी चार महिने मिळणार मोफत धान्य …

प्रतिनीधी: स्वप्नील कदम

पुणे : केंद्र सरकारने देशातील शिधापत्रिकाधारकांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. पुणे शहर अन्न-धान्य वितरण अधिकारी सचिन ढोले यांनी या बाबत ही माहिती दिली. अन्न- धान्य योजनेला डिसेंबर २०२१ ते मार्च २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

याचा लाभ पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एकूण २७ लाख ११हजार १५९ तर पुणे- पिंपरी- चिंचवड शहरातील एकूण १२ लाख ६९ हजार शिधापत्रिकाधारकांना होणार आहे. या मध्ये प्रती व्यक्तीला ३किलो गहू आणि २ किलो तांदूळ मोफत दिले जाणार आहे.
पुणे तसेच पिंपरी शहरात काही अपंग, आजारी नागरिक आहेत. त्याच बरोबर काहींना वेगवेगळया कारणास्तव धान्य घेता येत नाही किंवा प्रत्यक्ष स्वस्त धान्य दुकानापर्यंत येणे शक्य होत नाही. आशा सर्व नागरिकांना घरपोच धान्य पुरवण्याची व्यवस्था केल्याचे सचिन ढोले यांनी सांगितले.

ढोले म्हणाले, चांगले सहकार्य भारतीय अन्न महामंडळाकडून मिळत आहे.या महिन्यातही रेशनवरील गहू आणि तांदूळ चागल्या दर्जाचे मिळाले आहेत. चालू महिन्यात पुणे शहरासाठी जवळपास १२हजार ६०० मेट्रिक टन एवढा तांदूळ आणि गहु मिळाला आहे. नोव्हेंबर महिन्यातील जवळपास ९४.५ टक्के वाटप करण्यात आले.