पुणे

दोन गावठी पिस्टलसह दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात

हवेली प्रतिनिधी :-अमन शेख

      खेड शिवापूर येथून २ गावठी पिस्टलसह दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याब्यात घेतले असून त्यांच्याकडे ४ जिवंत काडतुसे मिळून आली आहेत

        पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पथक राजगड पोलीस स्टेशन हद्दीत गस्त घालत असताना पोलिस शिपाई प्राण येवले यांना मिळालेल्या बातमीनुसार राजगड पोलीस स्टेशन हद्दीत पुणे ते सातारा महामार्गावर कोंढणपूर चौकात पुलाखाली उभे असलेल्या दोन व्यक्तींच्या संशयास्पद हालचाली करताना दिसल्या बातमीच्या वर्णनाप्रमाणे या दोन व्यक्ती संतोष अंकुश डिम्बळे, वय २१ वर्षे, रा.दत्तनगर, टेलको कॉलनी, ता.हवेली जि.पुणे,  उमेश दिलीप वाव्हळ, वय २५ वर्षे, रा.बांडेवाडी, खेड शिवापूर, ता. हवेली, जि.पुणे यांना सापळा रचून ताब्यात घेवून त्यांची अंगझडती घेऊन त्यांचेकडून विनापरवाना व बेकायदेशीर हेतुने दोघांच्याही कमरेला बाळगलेले प्रत्येकी १ गावठी पिस्टल व मॅगझीन मध्ये २ जिवंत काडतुस असे एकूण २ गावठी पिस्टल व ४ जिवंत काडतुसे असे एकुण १,००,४००/-रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे.

      गावठी पिस्टल कुठून व कोणत्या हेतूने आणले याबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी हे दोन्ही पिस्टल प्रवीण मोरे रा.शिवरे ता.भोर, जि.पुणे याने आमच्याकडे ठेवायला दिले होते अशी माहिती दिली. पुढील कारवाईसाठी त्यांना राजगड पोलीस स्टेशनचे ताब्यात दिलेले आहे.

          ही कामगिरी  स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक रामेश्वर धोंडगे, ए.एस. आय/ प्रकाश वाघमारे, पोलिस नाईक अमोल शेडगे, पोलिस शिपाई प्राण येवले यांचे पथकाने केली आहे