हवेली प्रतिनिधी :-अमन शेख
पुणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांचे विभाजन करुन तीन नवीन पोलीस स्टेशन तयार करण्याच्या प्रस्तावाला गृह विभागाने मंजूरी दिली आहे. तसेच दौंड उपविभागाचे विभाजन करुन नवीन शिरुर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या निर्मितीला गृह विभागाने मंजूरी दिली आहे. नवीन पोलीस स्टेशन आणि उपविभागीय कार्यालयाच्या निर्मितीचा शासन निर्णय सोमवारी (दि. 13) काढण्यात आला आहे.
पुणे ग्रामीण पोलीस दलातील बारामती तालुक आणि वडगांव निंबाळकर पोलीस ठाण्याचे विभाजन करुन माळेगाव पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली आहे. नव्याने होणाऱ्या माळेगाव पोलीस ठाण्याला 80 पदे निर्माण करण्यास आणि त्यासाठी लागणाऱ्या 6 कोटी 59 लाख 47 हजार 872 रुपयांच्या खर्चाला देखील मान्यता देण्यात आली आहे.
पुणे पोलीस आयुक्तालयातील लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे विभाजन करण्यात आले आहे. लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे विभाजन करुन उरुळी कांचन पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र हे पोलीस स्टेशन ग्रामीण पोलीस दलात राहणार आहे. उरुळी कांचन पोलीस ठाण्यासाठी 100 पदे निर्माण करण्यास आणि त्यासाठी लागणाऱ्या 6 कोटी 48 लाख 27 हजार 300 रुपयांच्या खर्चास मंजूरी देण्यात आली आहे.
पुणे ग्रामीणच्या कार्यक्षेत्रात असलेल्या इंदापूर पोलीस ठाण्याचे विभाजन करुन निरा-नृसिंहपुर पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली आहे. निरा-नृसिंहपुर पोलीस ठाण्यात 55 पदे निर्माण करण्याच्या पदांना आणि त्यासाठी लागणाऱ्या 4 कोटी 59 लाख 91 हजार 932 रुपयांच्या खर्चाला गृह विभागाने मंजूरी दिली आहे.
शिरुर उपविभागीय कार्यालय
पुणे जिल्ह्यतील पोलीस ठाण्यांचे विभाजन करुन तीन नवी पोलीस स्टेशनची निर्मिती करण्यास मंजूरी दिली आहे.
याशिवाय दौंड उपविभागाचे विभाजन करुन नवी शिरुर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या निर्मितीला गृह विभागाने मंजूरी
दिली आहे.
शिरुर उपविभागीय कार्यालयांतर्गत शिरुर पोलीस स्टेशन शिक्रापूर पोलीस स्टेशन
आणि रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यांचा
समावेश असणार असून पोलीस उप अधीक्षकाचे पद निर्माण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.