पुणे

उरुळी कांचन पोलीस ठाण्यास राज्य शासनाची मान्यता, उरुळी कांचन ग्रामीण मध्ये राहणार…

प्रतिनीधी : स्वप्नील कदम

लोणी काळभोर: राज्य शासनाने लोणी पोलीस ठाण्याचे विभाजन करून नवीन उरुळी कांचन पोलीस ठाणे निर्माण करण्यास मान्यता मिळाली आहे. हे पोलीस स्टेशन ग्रामीणमध्ये राहणार आहे. हा निर्णय तात्काळ लागू होणार असल्याने आमदार अशोक पवार यांच्या मागणीला यश आले आहे. आमदार अशोक पवार यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्यामुळे अखेर त्यांच्या मागणीला यश आले आहे. उरुळी कांचन स्वतंत्र तयार करण्यासाठी ६ कोटी ४८ लाख २७ हजार ३०० रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे.

या पोलीस ठाण्यात एकूण १०० पदे भरली जाणार असून या मध्ये एक पोलीस निरीक्षक, ४ सहाय्यक पोलिस निरिक्षक, ५ पोलीस निरीक्षक, २० पोलीस हवालदार,२५ पोलीस नाईक, तर पोलीस शिपाई ३० पदे भरली जाणार आहेत.