प्रतिनीधी : स्वप्नील कदम
बीड : बीड शहरातील बसस्थानक परिसरामध्ये असणाऱ्या, हॉटेल अतिथी बारवर, बीड पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकला आहे. हॉटेल अतिथी बारचा सध्याचा परवाना बंद असतानाही, हॉटेलमध्ये खुलेआम दारू विक्री सुरू होती. ही माहिती मिळल्यावरून रात्री११ वाजता, एसीपी पंकज कुमावत यांच्यासह राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन घुले यांनी, टीमसह हॉटेल अतिथीवर छापा टाकला आहे.यावेळी अवैधपणे विकल्या जाणाऱ्या देशी- विदेशी दारुसह, बियरचे बॉक्स अशी एकूण ९१ हजार ७६५रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे. यावेळी गौस सत्तार पठाण (वय- ३९) रा. बालेपीर बीड याला अटक केली असून मुख्य आरोपी निखिल सुरेंद्र जयस्वाल याचा पोलीस शोध घेत आहे.दरम्यान याप्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ च्या कलम ६५ ई नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास प्रभारी निरीक्षक रमेश घोरपडे करत आहेत.