प्रतिनीधी: स्वप्नील कदम
पिंपरी : पिंपरी- चिंचवड एक संताप जनक घटना समोर आली आहे. एका १९ वर्षीय मुलीवर तीच्या मित्रासह तिघांनी सामूहिक बलात्कार केला आहे. या प्रकरणी सांगवी पोलीसांनी चोघाना अटक केली आहे. पिंपळे गुरव च्या देवकर पार्क परिसरात ही घटना घडली आहे.
या प्रकरणी पीडित तरुणीने सांगवी पोलीसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रथमेश उर्फ सनी खैरे , स्वराज कदम आणि प्रथमेशच्या एका मित्रावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. यातील दोघांना पोलीसांनी अटक केली असून तिसऱ्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमेश उर्फ सनी खैरे याने पीडित मुलीला आपल्या प्लेटवर बोलावून घेतले होते. त्यानंतर त्याने तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेऊन तिचे अश्लील छायाचित्रे काढली. त्यानंतर पीडित मुलगी आपल्या घराकडे जात असताना तिचे नग्न छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने परत तिला फ्लॅटवर बोलावून घेतले त्यानंतर सनीच्या दोन मित्रांनी देखील पीडित मुलीवर बळजबरीने बलात्कार केला आहे. या घटनेचे गांभीर्य पाहून सांगवी पोलिसांनी तातडीने दोघांना अटक केली आहे .तिसऱ्या आरोपीचा शोध सांगली पोलीस करत आहे.