पुणे

उत्तरप्रदेश मधील लखीमपुर साठी महाराष्ट्र बंद व रास्ता रोको होऊ शकतो तर शिरुर -हवेली मधील शेतक-यांसाठी रास्ता रोको केला तर काय गुन्हा – पै संदीप भोंडवे …

प्रतिनीधी: स्वप्नील कदम

“`बळीराजाचा शेत डीपी वरील विद्युत पुरवठा बंद करुन त्यांचे हाताशी आलेले उभे पिक पाण्याअभावी जाळण्याचे दुष्कृत्य सध्या राज्य शासन व विद्युत महावितरण करत आहे.  या कृत्याचा  निषेध नोदविण्यासाठी व शेतपंपाची विद्युत बिल 100 टक्के माफ व्हावेत या करीता भारतीय जनता पार्टी हवेली तालुका व पंचक्रोशीतील शेतकरी बांधव  यांच्या वतीने रविवार दीनांक 19 .12.2021 रोजी स. 11 वाजता उरुळीकांचन येथे शांततामय मार्गाने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले परंतु रास्ता रोको आंदोलन सुरु होण्याअगोदर पोलिस प्रशासनाने भाजपा कार्यकर्ते व शेतकरी बंधु यांच्यावर जोर जबरदस्ती करुन त्यांना पोलीस लाॅकअप मध्ये बंद केले.
 उत्तरप्रदेश मधील लखीमपुर प्रकरणात महाविकास आघाडी सरकारने 11 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंद करुन आमदार श्री अशोक पवार यांच्या नेतृत्वाखाली लोणीकाळभोर येथे रास्ता रोको आंदोलन केले परंतु सदर रास्ता रोको आंदोलनावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही व कोणासही अटक झाली नाही परंतु शिरुर – हवेली तालुक्यातील शेतक-यांच्या विद्युत बिल माफी प्रकरणी शासनाचे लक्ष वेधुन घेण्यासाठी भाजपा व स्थानिक शेतकरी यांच्या वतीने रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला तर लगेच पोलीसांनी आंदोलनकर्त्यांना पोलीप लाॅकअप ढांबुन गुन्हे दाखल केले .
    एकाच पोलिस स्टेशनच्या हद्दीत  एकाच प्रकारच्या आंदोलनासाठी दोन भिन्न प्रकारची वागणुक पोलिसांनी दीलेली असुन 11 आक्टोंबर रोजीच्या लखीमपुरसाठीच्या रास्ता रोकोकडे कानाडोळा व स्थानिक शेतक-यांच्या विज बील प्रश्नी रास्ता रोकोसाठी लगेचच गुन्हे दाखल हे पोलीस प्रशासनाने वागणे नक्कीच निषेधार्थ आहे .
     लवकरच या प्रकरणी वरीष्ठ पोलीस अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडे दाद मागण्यात येणार असुन राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने 11 आक्टोंबर 2021 रोजी लोणीकाळभोर येथे करण्यात आलेल्या रास्ता रोकोसाठी सुध्दा हाच न्याय देऊन सदर आंदोलनकर्त्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी हवेली भाजपाच्या वतीने करण्यात येणार आहे . 

पै संदीप उत्तमराव भोंडवे
अध्यक्ष- पुर्व हवेली तालुका