दि. २५/१२/२०२१ रोजी महाराष्ट्र आरोग्य मंडळाच्या साने गुरुजी आरोग्य केंद्र मध्ये कान्हुरच्या प्रथमेश मिडगुले याला एल एन ४ कृत्रिम हात बसवण्यात आला. प्रथमेश चा हात कडबाकुट्टीमध्ये कापला गेला होता. एल एन ४ कृत्रिम हात अमेरिकेतून एल एन मिडोज या संस्थेतून येतो, हा हात अत्याधुनिक, सोपा, सुटसुटीत, वापरण्यास सोपा आहे. या कृत्रिम हातामुळे प्रथमेशचे आयुष्य बदलून जाणार आहे, त्याला दैनंदिन कामे करण्यास मोठी मदत होणार आहे. महाराष्ट्र आरोग्य मंडळ व रोटरी क्लब ऑफ पूना डाऊनटाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने सानेगुरुजी आरोग्य केंद्रांमध्ये एल एन ४ कृत्रिम हाताचे कायमस्वरूपी केंद्र सुरू आहे. प्रत्येक शनिवारी दुपारी २-०० वा. हात बसवण्यात येतात. दि. २२/१२/२०२१ रोजी सकाळ पेपरच्या बातमीची दखल घेऊन प्रथमेशला एल एन ४ कृत्रिम हात आज बसवण्यात आला. श्री. अमोल झगडे यांनी हात बसला व श्री. हसनमीया शेख यांनी हात वापरण्याचे प्रशिक्षण दिले. यावेळी महाराष्ट्र आरोग्य मंडळाचे सचिव श्री. अनिल गुजर, रोटरी क्लब ऑफ पूना डाऊनटाऊनचे रो. प्रदीप मुनोत, रो. जितू मेहता, विद्याधाम विद्यालय कान्हूर मेसाई ता. शिरूर जि. पुणे चे मुख्याध्यापक श्री. अनिल शिंदे प्रथमेशची आई सौ. सविता मिडगुले, सोमनाथ राक्षे, निलेश खरडे, सोमनाथ पिंगळे, सुनील जिते हे होते.
कान्हूरच्या प्रथमेशला मिळाला एल एन ४ कृत्रिम हात
December 27, 20210
Related Articles
March 16, 2019855
कानाखाली मारल्याचा जाब विचारल्याने, भररस्त्यात आयटी पार्क मधील अभियंत्याची हत्या पुण्यातील प्रकार; गुन्हेगारी प्रचंड वाढली
पुणे (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज)
कानाखाली मारल्याचा जाब विचारला म्हण
Read More
July 23, 20230
काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या वाढदिवसानिमित्त धार्मिक व सामाजिक ऐक्याचा संकल्प
आज सर्व धर्माच्या धर्मगुरूंनी काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे या
Read More
May 12, 20200
रोखठोक महाराष्ट्र न्युज फ्लॅश….. २० लाख कोटींचं पॅकेज पंतप्रधान नरेद्र मोदींनी केले जाहीर ! कोरोनाच्या संकटात आत्मनिर्भर भारतची केली घोषणा
नवी दिल्ली, दि. १२ –
कोरोना महामारीमुळे विस्कटलेल्या आर्थिक घडीला बुस्
Read More