पुणे

भारत फोर्ज कडून विविध विकास कामांचे लोकार्पण

भारत फोर्ज जि. पुणे व सहयोगी सेवा संस्था महाराष्ट्र आरोग्य मंडळ, पुणे यांचेमार्फत भारत फोर्ज लि. कंपनीच्या सीएसआर निधीतून श्रीक्षेत्र वडगाव काशिंबेग येथे जि. प. शाळेसाठी दोन वर्गखोल्या तसेच वाळुंजवाडी (ठाकरवाडी-श्रीरामनगर) येथे २० हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी व १७० मीटर सिमेंट कॉंक्रीट रस्ता या कामांचे लोकार्पण शुक्रवार दिनांक २४ डिसेंबर २०२१ रोजी भारत फोर्ज लि. पुणे च्या सीएसआर विभाग प्रमुख मा. श्रीमती लीना देशपांडे मॅडम व महाराष्ट्र आरोग्य मंडळाचे सचिव मा. श्री. अनिल गुजर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी श्री महालक्ष्मी मंदिर सेवा समिती मगरपट्टा सिटी, पुणे यांच्यामार्फत मिळालेल्या साड्यांचे वाटप वाळुंजवाडी-ठाकरवाडी येथील सर्व महिलांना करण्यात आले.
यावेळी मा. श्रीमती लीना देशपांडे यांनी आपले विचार व्यक्त करताना भारत फोर्ज कंपनी सामाजिक उत्तरदायित्वाच्या भूमिकेतून गेल्या ४० वर्षांपासून हे कार्य करीत असून सिंचन, शिक्षण’ स्वच्छता व आरोग्य यामध्ये काम करत असल्याचे सांगितले. श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग ग्रामस्थांची एकी, लोकसहभाग व वाळुंजवाडी ठाकरवाडी ग्रामस्थांचा साधेपणा व सचोटीचे त्यांनी कौतुक केले. सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी पंचायत समितीचे सभापती मा. श्री. संजय गवारी, माजी उपसभापती मा. श्री. नंदकुमार सोनवले. जि. प. सदस्य अरुणाताई थोरात, पं स. सदस्य राजाराम बाणखेले, मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीचे संचालक मा. शंकरशेठ पिंगळे यांनी आपल्या भाषणात भारत फोर्ज कं. च्या सीएसआर निधीतून झालेल्या कामाबाबत गौरवोद्गार काढून कामाचा दर्जा व योग्य ठिकाणी होत असलेली कामे याबद्दल सर्व टीमचे अभिनंदन केले.
याप्रसंगी मा. सुरेश काळे महाराष्ट्र आरोग्य मंडळ, जयदीप लाड, भारत फोर्ज सीएसआर विभाग मा. मारुतीशेठ डोके संचालक खरेदी-विक्री संघ,मा. शांताराम भैय्ये अध्यक्ष देवस्थान ट्रस्ट, माजी आदर्श सरपंच बाळासाहेब पिंगळे, बाळासाहेब शिंदे, श्री. मच्छिंद्र तळपे, मुख्याध्यापक जि. प. शाळा वडगाव काशिंबेग तसेच ग्रामस्थ पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन श्री. रवी डोंगरे, मनोज बोरा, राहुल रहाटवडे, गोरक्षनाथ कराळे व विना फटदाले या शिक्षकांनी केले. श्री. सुरेंद्र डोके यांनी प्रास्ताविक, श्री. बाळासाहेब सैद व महेश डोके यांनी सूत्रसंचालन केले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रशांत वाळुंज यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.