हवेली प्रतिनधी :- अमन शेख
लोणी काळभोर : कोयता आणि रॉडचा धाक धाखवून कोरेगाव मुळ (ता. हवेली) येथील दुचाकीस्वाराला लुटणाऱ्या 2 अट्टल चोरट्यांना लोणी काळभोर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून दुचाकीसह सुमारे 40 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
वैभव राजाराम तरंगे (वय 19, सध्या रा. गोळीबार मैदान, ता. हवेली, मुळ
रा.मु.पो.वाकडी ता. परांडा जि. उस्मानाबाद)आणि राजेंद्र दत्तात्रय मुसळे (वय 19 सध्या रा. डांगे चौक, पिंपरी, मुळ रा. कोरेगाव मुळ ता. हवेली) असे अटक केलेल्या सराईतांची नावे आहेत. या प्रकरणी मुकेश सुरवसे (वय 27 फुरसुंगी ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकेश सुरवसे हे त्यांच्या दुचाकीवरून शुक्रवारी (दि. 24) उमरगा (जि. उस्मानाबाद) येथे चालले होते. त्यांची दुचाकी कोरेगाव मुळ गावच्या हृददीतील प्रयागधाम फाट्याजवळ मध्यरात्रीच्या सुमारास आली आरोपीनी सुरवसे यांना कोयता व रॉडचा धाक दाखवुन त्यांच्याकडील विवो कंपनीचा मोबाईल हिसकाऊन घेतला. आणि तेथून पसार झाले. याप्रकरणी मुकेश सुरवसे यांनी अज्ञात चोरट्यांविरोधात लोणी काळभोरपोलीस ठाण्यात तक्रार दिली. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी गुन्ह्याचा तपास करण्याच्या सूचना सहकार्यांना दिल्या होत्या.
त्यानुसार आरोपींच्या वर्णनाप्रमाणे पोलीसांच्या पथखाने परिसरात तपास सुरु केला. त्यावेळी पोलिसांना सदर गुन्ह्यातील आरोपी वैभव तरंगे आणि राजेंद्र मुसळे असल्याची पक्की माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून विवो कंपनीचा मोबाईल आणि गुन्ह्यात वापरले हत्यारे आणि एक हिरो होंडा स्प्लेंडर मोटार सायकल असा एकुण सुमारे 40 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजु महानोर, पोलीस उपनिरीक्षक जयंत हंचाटे पोलीस हवालदार नितीन गायकवाड, सुनिल नागलोत, राजेश दराडे श्रीनाथ जाधव, अमित साळुंखे, संभाजी देविकर, वसंत चव्हाण, बालाजी बांगर, निखील पवार, बाजीराव वीर आणि शैलेश कुदळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे.