प्रतिनीधी: स्वप्नील कदम
पिंपरी: शहरात सर्वत्र नवीन वर्षाचे स्वागत होत असताना (दि .३१) रात्री ९ च्या सुमारास पिंपरी-चिंचवडमधील चिखली येथे एका तरुणाचा डोक्यात सिमेंट ब्लॉक घालून खून करण्यात आला आहे. भररस्त्यात घडलेली ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही त कैद झाले आहे. दहा दिवसात खुनाची ही चौथी घटना आहे. या घटनेनंतर पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे.कारण, पिंपरी चिंचवड येथील हत्या सत्र काही केल्या थांबत नसल्याने हा प्रश्न पडला आहे.
सुनील सगर ( वय,३५) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. सुनील हा जीव वाचवण्यासाठी चिखली येथील एका दुकानात पळत सुटला होता. पण आरोपीने तिथे सर्वांसमोर अमानुषपणे मारहाण केली. त्यानंतर दुकानातुन बाहेर येताच सिमेंट ब्लॉकने ठेचून सूनीलची हत्या केली.
काही दिवसांपूर्वी १८ डिसेंबरला पिंपळेगुरवमध्ये भरदिवसा योगेश जगताप याच्यावर गोळीबार करून त्याचा खूण करण्यात आला होता. त्यानंतर २२ डिसेंबरला तळेगाव मध्ये इंस्टाग्राम वरील स्टेटस प्रकरणावरुन ११ वित शिकणाऱ्या मुलावर गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. दशांत परदेशी असे खून झालेल्या १७ वर्षीय मुलाचे नाव होते. त्यानंतर २३ डिसेंबरला पैलवान नागेश कराळे वर १० गोळ्या झाडून हत्या झाली होती. खेड तालुक्यात ही घटना घडली होती. हा सर्व प्रकार देखील सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता त्यानंतर काल सुनील सगरची झालेली हत्या.