हडपसर (पुणे)
मांजरी, हडपसर पुणे येथील व्हिनस वर्ल्ड स्कूल मध्ये इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या स्वरूप शेलार या अवघ्या १० वर्षे वय असलेल्या चिमुकल्या गियोरोहकाने मनाली(हिमाचल प्रदेश) येथील पिर प्रांजल पर्वत रांगेतील पतालसू व फ्रेंडशिप ही दोन्ही शिखरे एकाच मोहिमेत सर करण्याचा विक्रम केला आहे.
स्वरुपला लहान वयात ट्रेकिंगचा छंद जडला होता.वडकीमार्गे पुरंदर तालुक्यातील कानिफनाथ गडावरील पहिली चढाई त्याने वयाच्या पाचव्या वर्षी केली, त्यातूनच त्याला डोंगर दऱ्यांची माहिती जमवून अभ्यास करण्याचा ध्यास लागला. महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसूबाई शिखर त्याने वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी सर केले,त्याच्या या कामगिरीने लहान वयाचा गिर्यारोहक म्हणून त्याची ओळख झाली.स्वरुपला क्रीडा शिक्षक असलेल्या आई नीलम शेलार व खाजगी कंपनीत नोकरी करत असलेले वडील प्रवीण शेलार यांच्याकडून त्याला लहानपणापासून बाळकडू मिळत होते, तसेच आजी पोलिस निरीक्षक द्वारका डोखे यांच्याकडून त्याला ट्रेकिंगची प्रेरणा मिळाली.
ड्रीम अॅडव्हेंचर संस्थेने पतालसू ,फ्रेंडशिप आणि माऊंटन शितीधर या शिखरांची मोहीम आयोजित केली होती.या मोहिमेत एकूण १६ सदस्यांनी सहभाग घेतला होता व त्याचे नेतृत्व महाराष्ट्र पोलीस दलाचे पहिले एव्हरेस्टवीर रफिक शेख यांनी केले,या मोहिमेत छोटा स्वरूपही सहभागी झाला होता.
सदर मोहिमेसाठी उद्योजक दशरथ जाधव, व्हिनस वर्ल्ड स्कूलचे संचालक माधव राऊत, प्राचार्या मृण्मयी वैद्य, पोलिस हवालदार ब्रम्हादेव मेटे, गणेश पवार यांनी मोलाचे सहकार्य केले.
मला आई वडील व आजीकडून लहानपणापासून डोंगरदऱ्यात भटकंती करायला मिळाली, त्यातून ट्रेकिंगचा छंद जडला. आफ्रिकेतील किली मांजरो आणि एव्हरेस्टचा बेल कॅप सर करण्याचे पुढचे ध्येय छोट्या शिखरवीर स्वरुपचे आहे आणि गिर्यारोहणांमध्ये कॅरियर करुन भारत देशाचे नाव उंचावण्याचा निश्चय छोट्या स्वरुपने केला आहे.
या छोट्या शिखरवीरांने कमी वयात ही दोन्ही शिखरे सर केल्याने त्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली आहे