हवेली

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघांची संकल्पना विनामास्क फिरणार्यावर गुलाब व मास्क देऊन जनजागृती

हवेली प्रतिनिधी :- अमन शेख

कदमवाकवस्ती : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोणी काळभोर,कदमवाकवस्ती परिसरात विनामास्क रस्त्यांवर फिरणाऱ्यांच्यात संख्येत दिवसेंदिवस वाढतच चालल्याने लोणी काळभोर पोलीस,वाहतूक विभाग व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या हवेली तालुक्याच्यावतीने या ”बिनफिकीर्यां’च्या विरोधात दंडात्मक कारवाई न करता “जीवाला जप आरोग्याची काळजी घ्या”अशी समज देत गुलाबपुष्प व मास्क देऊन गांधीगिरी अभियान केले.या कारवाईत लोणी काळभोर वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे,पोलीस उपनिरीक्षक भागवत शेंडगे,पो.ना.उमेश ढाकणे,आनंद साळुंखे,अनिल गायकवाड,महेश मडके, मनोज सोनवणे,विजय काणेकर,अजिंक्य जोजारे,संदीप धुमाळ तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे शरद पुजारी,हवेली तालुका अध्यक्ष पंढरीनाथ नामुगडे,उपाध्यक्ष गणेश धुमाळ,सहसचिव दिगंबर जोगदंड,अमन शेख,दत्तात्रय कांबळे,कदमवाकवस्ती ग्रामपंचायत सदस्य नितीन लोखंडे यांनी सहभाग घेतला.विनायक काळभोर यांनी मास्क उपलब्ध करून दिले.महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या संकल्पनेतुन नागरिकांमध्ये मास्क संदर्भात जनजागृती व्हावी या उद्देशाने ही संकल्पना राबविण्यात आली.सध्या कोरोना रुग्णांचे प्रमाण झपाट्याने वाढू लागले आहे याचे गांभिर्य नागरिकांमध्ये खूप कमी झाले आहे.या जनजागृती मोहिमेत कार्यवाही करताना बहुतांश नागरिक पोलीसांना पाहुन मास्क लावत होते तर काही जण माघारी पळून जात होते.त्यांना समजावून मास्कचे महत्त्व पटवून दिले.

विनामास्क फिरणार्यावर अनेकदा दंडात्मक कारवाई करून देखील नागरिक मास्क वापरत नसल्याचे निदर्शनास येत आहे.त्यामुळे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या या संकल्पनेस त्वरित होकार देऊन ही मोहीम केली.

उत्तम चक्रे-पोलीस निरीक्षक
लोणी काळभोर वाहतूक विभाग