प्रतिनीधी : स्वप्नील कदम
लोणी काळभोर :लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीत खुनाच्या गुन्ह्यात जामिनीवर सुटलेल्या आरोपी व त्याच्या वडिलांची निर्घृण हत्या करणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार व एस.एस गँगचा स्वयं घोषीत म्होरक्या निखिल देवानंद पाटील व त्याच्या २३ साथीदारांवर पुणे शहर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, टोळी प्रमख निखिल देवानंद पाटील व त्याचा साथीदार लोणीकंद येथील एस.एस. गँगचा म्होरक्या सचिन नानासाहेब शिंदे याचा खून करणाऱ्या आरोपीचा बदल घेण्यासाठी (ता. १२ जानेवारी) लोणीकंद भागात सायंकाळच्या सुमारास घातक हत्यारांचा वापर करून सनी कौमारी शिंदे व कुमार मारुती शिंदे यांचा खून करून लोणीकंद परिसरात दहशत माजवली असून आरोपींवर लोणीकंद पोलीस स्टेशन येथे भा.द.वि कलाम ३०२, ३०७, ३४१, १४३, १४७, १४८, १४९, ४२७, १२०, (ब), २०१ आर्म ऍक्ट २ सह २५, ४ सह २५, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट कलम ३, ७, म.पो.का. ३७(१), १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानुसार दाखल गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९ चे कलम ३(१)(i), ३(२), ३(३), ३(४) अन्वये मान्यता मिळण्यासाठी सादर कायद्याचे कलम २३(१)अ अन्वये मंजूर होणेबाबत मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश तटकरे यांनी मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०४ पुणे रोहिदास पवाईम यांच्या मार्फत मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग पुणे नामदेव चव्हाण याना प्रस्ताव सादर केला होता.
या प्रस्तावाची छाननी करून टोळी प्रमुख निखिल देवानंद पाटील, व त्याचे २३ साथीदार नानासाहेब बाबुराव शिंदे, आशुतोष नानासाहेब शिंदे, शुभम रामचंद्र वाभळे, ऋग्वेद उर्फ (छकुल्या) जालिंदर वाळके, माउली उर्फ (केतन) रामदास कोलते, ऋतिक महादू किंकर, अभिषेक रवींद्र गव्हाणे, प्रतीक अनिल कंद, हृषीकेश सत्यवान आरगडे, शुभम उर्फ (मोन्या) अशोक भंडारे, आलोक महादेव सूर्यवंशी, अभिषेक भानुदास लंघे, ओंकार सुनील इंगवले, गणेश अशोक भालेराव, अथर्व अंकुश कंद, गणेश रामकिसन राऊत, दीपक रंगू राठोड, रोहन रुषिकेश गायकवाड, रवी धोंडीराम चव्हाण, प्रतीक दिलीप तिजोरे, अक्षय बापूराव गिरीमकर, निलेश जितेंद्र काळे, निखिल नितीन जगताप यांच्या विरुद्ध महारष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९ चे काळमी ३(१)(i), ३(२), ३(३), ३(४) या कलमांचा अंतर्भाव करण्याची परवानगी अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण यांनी मंजुरी दिली आहे. पुढील तपास सहा. पोलीस आयुक्त येरवडा विभाग पुणे किशोर जाधव हे करीत आहे.
या टोळीवर मोक्का कारवाई करण्या अंतर्गत पोलीस आयुक्त पुणे शहर अमिताभ गुप्ता, मा. सह पोलीस आयुक्त पुणे शहर रवींद्र शिसवे, मा. अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उप आयुक्त रोहिदास पवार, सहा. पोलीस आयुक्त कोशोर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोणीकंद पोलीस स्टेशन गजानन पवार, पोलीस निरीक्षक गुन्हे राजेश तटकरे, पोलीस निरीक्षक मारुती पाटील, पोलीस उप निरीक्षक श्रीकांत टेमगिरे, व सर्व्हेलन्स पथकातील पोलीस नाईक प्रशांत कापुरे, सागर कडू यांनी केली आहे.
दशहत माजविणाऱ्यांवर लक्ष्य
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणे आयुक्तालयाचा कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन शरीराविरुद्धा व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणारे व समाजामध्ये दहशत निर्माण करणारे सरहित गुन्हेगार यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष देऊन गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन होईल देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार याना निर्देश दिले आहेत.