पुणे (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाइन न्युज)
सध्या सोशल मीडियावर कोण होणार नगरसेवक? आपली पसंती कोणाला? महिला ओबीसी मधून कोण निवडून येणार? पुरुष गटातून कोण उमेदवार असणार? असे एक ना अनेक प्रश्न विचारत सध्या हडपसर मतदारसंघात ऑनलाइन पोलचे पेव फुटले आहे, नगरसेवक अन कार्यकर्ते सोशल मीडियावर जोरदार कामाला लागले असून या फेक पोलमुळे अनेकांची फसगत होताना दिसत आहे, ज्यांनी पोल बनविला त्यांनाच मते जास्त जात असल्याने ऑनलाइन सुद्धा फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आल्याने हा पोल देखील मॅनेज असल्याची चर्चा रंगली आहे.
पुणे महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर झाली अन इच्छूक उमेदवारांचे आराखडे सुरू झाले, कार्यक्रम, वाढदिवस, ट्रिप अन वस्तूंचे वाटप करणारे महिलांचे कार्यक्रम जोरदार सुरू झाले, त्यातच निवडणूक नियोजन करणाऱ्या टीमने नवा फंडा बाजारात आणला अन भावी नगरसेवक व कार्यकर्ते कामाला लागले आहेत.
आपल्या नेत्यांची लिंक करून या प्रभागातुन तुमची पसंती कोणाला? ओबीसी महिला गटातून कोण निवडणूक येणार? पुरुष गटातून कोण सक्षम उमेदवार? असे एक ना अनेक कॅप्शन देऊन कार्यकते कामाला लावले आहेत, निवडणूक मॅनेजमेंट टीम यामध्ये पण हॅक पॉलिसी वापरत असून आपल्या उमेदवारास कशी जास्त पसंती मिळत आहे हे दाखवून लाखो रुपये उकळण्याचा धंदा तेजीत सुरू आहे, काही उत्साही स्वयंघोषित उमेदवार यासाठी पैसे मोजत असून वारंवार किती मते पडली तपासून त्यांना आनंदाच्या उकळी फुटत आहे, जणू नगरसेवक झाल्याच्या अविर्भावात हे वावरू लागले आहेत.
प्रत्यक्षात ज्यांचे प्रभागात मत नाही ते पोल देत असून त्यांचा आगामी महापालिका निवडणुकीत याचा काडीचा फायदा होणार नसल्याने उत्साही उमेदवारांचा हिरमोड होणार आहे.
यातच प्रजहितमचे दिपक कुदळे यांनी पोल टाकला असून यामध्ये आपल्या भागातील लोकप्रतिनिधी कसा असावा?
त्यामध्ये घराणेशाही मधला? टेंडर मधून कमिशन खाणारा? प्रस्ताव ठराव मध्ये मंजूर झालेले रस्ते स्वतःच्या मतलबासाठी अडवून ठेऊन नागरिकांना वेठीस धरणारा? जात नातेवाईक गृहीत धारून निवडणुकीस उभा राहणारा? 100 रुपयांच्या कामात 50 रुपये स्वतःला ठेवणारा? सरकारी जमिनी त्याब्यात ठेऊन स्वकमाई करणारा? मतदारांना दारू, मटण, पैसे, भेटवस्तू देणारा? कचरा डेपो आणणारा? बेकायदेशीर खासगी सावकारी करणारा? सरळमार्गी पैशाची उधळपट्टी न करता आचारसंहितेचे पालन करणारा?
असे टाकून सर्वांचेच कान टोचले आहेत?
ऑनलाइन पोल म्हणजे निव्वळ धुळफेक…
सध्या हडपसर विधानसभा मतदारसंघात ऑनलाइन पोलचे पेव फुटले आहे, प्रत्यक्षात ही बोगस यंत्रणा असून फेक पोल जात आहेत, म्हणजे मॅनेज पध्द्तीने चालल्याने हा नवीन फंडा आणि धंदा आहे, यावर विश्वास ठेवू नये, नगरसेवक पोल करून नाही तर कर्तृत्वाने निवडले जातात.
अभिजित बाबर
सामाजिक कार्यकर्ते