हवेली प्रतिनिधी:-अमन शेख
लोणी काळभोर कदमवाकवस्ती येथे बंद फ्लॅटचा कडी कोयटा उचकटून तीन लाख पंच्चावन हजार चे ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार याप्रकरणी शिवाजी गुलाबराव कदम (वय ५३ रा. स्वामीकुंज सोसायटी, संभाजीनगर, कदमवाकवस्ती, ता. हवेली) यांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी कदम हे लोणी काळभोरसह परिसरात प्लम्बिंगची कामे करतात. त्यांची पत्नी अनिता यांना दोन महिन्यापासून पोट दुखीचा त्रास होता. त्यांना मूळगावी एका खाजगी रुगणालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान शनिवारी (ता. १९) त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी कदमवाकवस्ती परिसरात राहत असलेली फ्लॅट बंद करून अंत्यविधीसाठी निघून गेले होते.गुरुवारी (ता. २४) शेजारी राहणारे विशाल पवार यांनी फोन करून सांगितले कि, तुमच्या रुमचा दरवाजा उघडा दिसुन येत आहे. त्यावेळी शेजारी राहणाऱ्या सुनिता पवार यांना घरी जावुन पाहणी करण्यास सांगितले. त्यावेळी त्यांनी फोनवर घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून येत आहे व सेफ्टी दरवाजा व आतील लाकडी दरवाज्याची कड़ी कशाचेतरी सहाय्याने तोडुन दरवाजा उघडला असल्याचे सांगितले.दरम्यान, संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास शिवाजी कदम हे मूळ गावावरून येऊन घराची पाहणी केली असता कपड़े अस्ताव्यस्त पडलेले दिसुन आले. तसेच लोखंडी कपाटातील लॉकर मधील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ३ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी पळवून नेला असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी शिवाजी कदम यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दिली आहे.पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत.