पुणे

कोरेगावमूळ दोघांवर गुन्हा दाखल, कोरेगावमूळ येथील महिलेला १ कोटी रुपयांचा गंडा

प्रतिनीधी:स्वप्नील कदम

लोणी काळभोर :शेअर बाजारात पैसै गुंतवणूक करा तुम्हाला चांगला परतावा देतो , म्हणून वेळोवेळी ऑनलाइन पद्धतीने १ कोटी १२ लाख रुपये रक्कम गुंतवणूक करायला लावून महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे.

ममता सिंह मलिक (वय- ३८, रा. अमरवस्ती, कोरेगाव मुळ उरुळी कांचन, ता. हवेली) या फसवणूक झालेल्या महिलेचे नाव असून त्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रवी कानकाटे उर्फ रवींद्र मुरलीधर भोसले उर्फ जगिश मुरलीधर भोसले, व स्वप्नील कानकाटे,( रा. दोघेही इनामदार वस्ती, कोरेगाव मूळ, ता. हवेली) अशी फसवणूक केलेल्या दोघांची नावे आहेत.त्यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

ममता मलिक यांचे कोरेगाव मूळ , इनामदार वस्ती येथे सैंद्रिय उत्पादन व विक्रीचा व्यवसायाचे ऑफिस आहे. या ठिकाणी काम करत असताना त्यांची ओळख रवि कानकाटे व स्वनील कानकाटे या दोघांची ओळख होऊन त्यांनी आर्युवेदीक न्युट्रीशियन बाबत माझ्याकडे चौकशी करुन काही उत्पादने खरेदी करुन घेवुन गेले होते. या दोघांनी मलिक यांना शेअर्समध्ये गुंतवणुक करुन चांगला मोबादला मिळून देतो म्हणून पैसे गुंतवणूक करायला भाग पाडले.

त्यातील स्वप्नील कानकाटे हा एचडीएफसी बँकमध्ये नोकरी असल्याचे सांगुन रवि कानकाटे यास तुम्ही पैसे द्या त्याची पूर्ण जबाबदारी मी घेतो असे सांगितले. अशाप्रकारे दोघांनी विश्वास संपादन करून मलिक यांच्याकडून सात महिन्यात रवि कानकाटे ऊर्फ रविंद्र मुरलीधर भोसले ऊर्फ जगीश मुरलीधर भोसले यांच्या बँक खात्यात नातेवाईक, मुलगा इतर व्यक्तीकडून घेऊन एक कोटी रुपये दिले होते.

रवि कानकाटे यांनी मलिक यांना गुंतवणुकीवरील परतावा म्हणुन दोन कोटी पन्नास लाख रूपयाचा एचडीएफसी बँकेचा रवि भोसले या नावाचा चेक दिला. सदरचा चेक बँकेत भरला तेव्हा ते खाते बंद असल्याचे बँकेकडून सांगण्यात आले. यावरून रवि भोसले नावाचा बंद झालेल्या बँकेच्या खात्याचा धनादेश देवून त्यांनी आर्थिक फसवणुक केल्याची तक्रार लोणी काळभोर पोलिसात दिली आहे.