हवेली प्रतिनिधी:-अमन शेख
सेफ्टी टॅन्कच्या सुरक्षिततेची कोणतीही काळजी न घेता सेफ्टी टॅन्कमध्ये भाडेकरू व कामगारांना उतरविले व विषारी युक्त वासाने चार जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या कदमवाकवस्ती (ता.हवेली) येथील घरमालकवर चौघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा लोणीकाळभोर पोलिसांनी दाखल केला आहे.राजनंदीनी पद्माकर वाघमारे (वय २६, रा. प्यासा हॉटेल मागे, कदमवाकवस्ती, ता. हवेली, जि. पुणे, मूळ वडगाव शिरढोण, ता. कळंब, जि. उस्मानाबाद ) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार घरमालक भिकाजी जयसिंग काळभोर (रा. सिद्राममळा, लोणीकाळभोर, ता. हवेली, जि. पुणे ) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार
कदमवाकवस्ती येथील हॉटेल प्यासा च्या पाठिमागील बाजूस भिकाजी काळभोर यांच्या इमारतीच्या सेफ्टी टॅन्क च्या कामासाठी त्यांनी मयत रुपचंद कांबळे यांना इमारतीत बोलविले होते. त्यानुसार रुपचंद कांबळे हे अन्य दोन कामगारांसह सेफ्टी टॅन्क मध्ये उतरले होते. मात्र ते बाहेर येत नसल्याने काळभोर यांच्याकडे भाडेकरू असलेले पद्माकर वाघमारे यांना त्यांनी घरातून उठवून जबरदस्तीने सेफ्टी टॅन्क मध्ये उतरण्यास भाग पाडले. त्यांनी सेफ्टी टॅन्क मधून बेशुद्ध पडलेल्या कामगार बाहेर काढताना, परंतु या कामात कोण काळजी न घेता पद्माकर वाघमारे उतल्यानेबाहेर काढताना, परंतु या कामात कोणताही काळजी न घेता पद्माकर वाघमारे उतल्याने त्यांचाही रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
पद्माकर वाघमारे यांच्या पत्नी दिलेल्या तक्रारीत, माझ्या पतीच्या व अन्य तिघांच्या मृत्यूस घरमालक भिकाजी काळभोर कारणीभूत असल्याची तक्रारीत मयत पद्माकर वाघमारे यांच्या पत्नी राजनंदीनी वाघमारे यांनी म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी चौघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी घरमालक भिकाजी काळभोर यांच्याविरुद्ध भा.द.वि. ३०४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.