पुणे

हडपसर मध्ये रोटी डे उत्साहात साजरा – उपक्रमात महिलांचा सहभाग लक्षणीय

फेब्रुवारी महिन्यातील अठ्ठावीस दिवसांपैकी 14 दिवस आपली तरुण पिढी पाश्‍चात्त्यांचे सण साजरे करण्यात दंग होत चालली आहे. आणखी काही वर्षांनी तर तरुण पिढी भारतीय सण सुद्धा विसरून जातील. म्हणून आजच आपण आपल्या तरुण पिढीला भारतीय संस्कृतीची जाणीव करून दिली पाहिजे.
भारतीय संस्कृतीत अन्नदान हे सर्व श्रेष्ठ दान मानले जाते. अन्नदान हे तोच माणूस करतो जो संवेदनशील असतो. अन्नदानाची जनजागृती करण्यासाठी रोटी डे टीम हडपसर २०१६ या वर्षापासून दरवर्षी एक मार्च रोजी रोटी डे हा उपक्रम राबवत आहेत. या उपक्रमात मनीषा राऊत, संगीता माळी, संगीता पिंपळे, अश्विनी वाघ, स्मिता गायकवाड, वंदना मोडक, रुपाली वाबुरे, स्वाती टिळेकर, दीपाली कवडे, विजया भोसले, नूतन झाम्बरे, कविता अबनावे, शोभा लगड, कविता पाटील, रुपाली शिंदे, विद्या लाटे, आयेशा तांबोळी, जयश्री तांबोळे, राणी पल्ला, योगिता गोसावी, संचिता गोसावी,स्नेहा पिंपरिकर, अश्विनी जगताप, अनुजा मिटकरी, स्मिता वाकडकर, सारिका अगरवाल, यास्मिन पठाण, राणी साठे, रंजना कोंडे, वर्षा इनामदार, अर्चना नाईक, आशा गिरमे, शारदा कोंढालकर, चेतना घोटवडेकर, स्वाती कदम,माधुरी रासकर, स्वाती डिंबळे, वंदना वसिष्ठ, निशिगंधा मोरे, जान्हवी बोरावके, वनिता खरात, रसिका गिरमे, निकिता यादव, जयश्री टिकारे, पारुल शहा, काजल माने, श्रुतिका क्षीरसागर महिला तसेच दिलीप मोरे, प्रकाश लोंढे, राहुल खलसे, सतीश कालेकर, आकाश जाधव, अजय खंडागळे, महेश सुतार, अविनाश अवघडे, प्रमोद अय्या, सचिन गोसावी, शंतनू जगदाळे, अकबर शेख, अकिल अत्तार, सचीन दिंडोकर, विजय गायकवाड, किरण खलसे, स्वप्नील वसवे, किरण जाधव, श्रीमंत मिटकरी, प्रशांत नवले, संजीव रासकर, बळीराम चव्हाण.पुरुष सहभागी झाले. या सर्व कार्यकर्त्यांनी घरोघर जाऊन तीन पोळ्या किंवा चपात्या व कोरडी भाजी गोळा करून कै. विठ्ठल तुपे नाट्यगृह माळवाडी हडपसर येथे संकलित केले. नावे टाकण्याचा हेतू हा की पुढच्या वर्षी अजून उमेदीने आम्ही हे कार्य करू. नंतर रोटी डे च्या कार्यकर्त्यांनी वेगवेगळे ग्रुप करून उड्डाणपुलाखालील गरजूंना, सिग्नल वरील, फुटपाथवरील, अनाथ आश्रम, वृद्धाश्रम, खानावळी, होस्टेलमध्ये अशा विविध ठिकाणी जे गरजू लोक आहेत. त्यांच्यापर्यंत हे सर्व अन्नाचे पॅकेट्स पोचवले. बिबवेवाडी, कल्याणी नगर, खराडी, मुंढवा, लोणी, केडगाव, सांगली, येरवडा घोरपडी जुना बाजार या ठिकाणी सुद्धा येथील रोटी डे कार्यकर्त्यांनी त्या परिसरात अन्नदानाचे काम केले. किती लोकांना अन्नदान केले याची गिणती मात्र करू नये या मताची मी आहे.
हडपसर मध्ये रोटी डेच्या उपक्रमात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. विठ्ठल तुपे नाट्यगृह येथे झालेल्या छोट्याशा कार्यक्रमास नगरसेवक मारुती आबा तुपे, बच्चू सिंग टाक, दत्ता दळवी, प्रशांत सुरसे, संजय शिंदे , महेश ससाणे या मान्यवरांनी आवर्जून हजेरी लावली. नाझिम शेख (लिमरा स्कूल) आणि शोभा ताई लगड (एस आर विक्टरी स्कूल) यांने विशेष प्रयत्न केले.. व रोटी डे च्या या उपक्रमाचे कौतुक केले व उपक्रमास शुभेच्छा दिल्या
सर्व महिला देहभान विसरून अननाच्या पॅकेट्स चे पॅकिंग करण्यात गुंग होऊन गेले होते. हे काम करताना त्यांना खूप आनंद झाल्याचे त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत होते.
याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप मोरे यांनी केले व मान्यवरांचे आभार डॉ. शंतनु जगदाळे यांनी मानले.