बारामती

घर फोडी करणारे सराईत गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात स्थानिक गुन्हे शाखा व बारामती पोलिसांची मोठी कामगिरी

प्रतिनिधी:-अमन शेख

पुणे  दिवसा बंद घर फोडून चोरी करणारे दोन सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखा व बारामती तालुका पोलीस स्टेशन कर्मचारी यांनी जरबंद केले आहेत त्यांनी माळेगाव बुद्रुक येथे दिवसा बंद घर फोडून सुमारे आठ लाख 98 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिन पळवले होते.

       पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या चोरीचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करीत होते हा तपास करताना गुन्हेगारांनी वापरलेली गाडी कुठून आली व ती कोठे गेली याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज पाहून शोध घेतला जवळपास आठ दिवस हे सीसीटीव्ही फुटेज तपासणी चालू होते यातून गुन्हे शाखेच्या पथकास गुन्हेगारांची माहिती मिळाली यामध्ये युवराज अर्जुन ढोणे वय 26 वर्ष रा. मिरजगाव खेतमाळीस वस्ती ता. कर्जत जि. अहमदनगर व अविनाश अर्जुन ढोणे वय 24 वर्षे यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे अधिक तपास केला असता हा गुन्हा त्यांनी केल्याचे मान्य केले या गुन्ह्यात चोरलेली सोने व चांदीचे दागिने त्यांनी निलेश कुंदनमल झाडमुथा रा. डोंगरण ता. आष्टी जि. बीड यास विक्री केल्याचे सांगितले यावरून त्यास ताब्यात घेतले आहे यातील युवराज ढोणे अविनाश ढोणे हे दोन्ही सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर घरफोडी, मोटारसायकल चोरी अशी अनेक गुन्हे दाखल आहेत त्यांना पुढील तपास कामी बारामती तालुका पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे

      ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख व अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, बारामती उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेळके, बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक घुगे, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, अनिल कुदळे, तुषार अंधारे, काशिनाथ राजपुरे, पोलीस हवालदार रविराज कोकरे, जनार्दन शेळके, विजय कांचन, राजू मोमीन, अजय घुले, पोलीस नाईक अभिजित एकशिंगे, स्वप्निल अहिवळे, मंगेश ठेकळे, पोलीस शिपाई धीरज जाधव आदींनी केली.