पुणे

एमआयटी एडीटी विद्यापीठाचे प्रा. डॉ राजेश जाधव यांना ऑक्सिजन जनरेश प्लॅन्ट निर्मिती केल्याबद्दल ‘सिंहगड गौरव पुरस्कार’

हवेली प्रतिनिधी:-अमन शेख

पुणे : एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेकनॉलॉजी विद्यापीठाचे प्रा. डॉ. राजेश जाधव यांना सावित्री फाऊंडेशनतर्फे यंदाचा कोविड काळामध्ये समाजासाठी ऑक्सिजन जनरेश प्लॅन्ट निर्मिती केल्याबद्दल ‘सिंहगड गौरव पुरस्कार’ देऊन नुकतेच गौरविण्यात आले.

प्रा. डॉ. राजेश जाधव हे एमआयटी स्कूल ऑफ इंजिनियरींग पुणेमध्ये प्राध्यापक कर्यरत आहेत. डॉ. राजेश जाधव यांनी तयार केलेल्या ऑक्सिजन जनरेश प्लॅन्ट मुळे कोरोना महामारीत रुग्णांना ऑक्सिजनची गरज काही प्रमाणात पूर्ण होण्यास मदत झाली.
याबद्दल एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष आणि कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड, प्र – कुलगुरू डॉ. अनंत चक्रदेव, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, डॉ. किशोर रवांदे यांनी अभिनंदन केले.